प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज परळी बंद ची हाक

 वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज परळी बंद ची हाक 


बीड (प्रतिनिधी) दि.31

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या विटंबना व महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलित समाजावरील वारंवार होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ दि. 02 नोव्हेंबर 2020   परळी बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात, लॉकडाउनच्या कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना माळेगांव जि.नांदेड, बर्दापुर .बीड तसेच येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना जातीवादी मनुवृत्तीच्या


नराधमांनी केली आहे. तसेच लॉकडाऊन दलित समाजातील लोकांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाडले आहे. 

एकूणच महाविकास आधाड़ी सरकारच्या कार्यकाळात होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहजन आधाडी परळी यांच्या वतीने दि.02. नोव्हेबर  रोजी परळी बंदचे अवाहन करण्यात येत जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे राज्याचे मराठवाड्याचे, व जिल्ह्याचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत असे शहराध्यक्ष संजय गवळी व गौतम साळवे यांनी कळवले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या