इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध आढावा बैठकींचे आयोजन

 पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध आढावा बैठकींचे आयोजन




बीड,दि. 02 :- (जि.मा.का) राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले असून या आढावा बैठकी पुढील प्रमाणे होणार आहेत. 

  सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे कोव्हिड-19 संदर्भात आढावा बैठक. दुपारी 12.00 वाजता सन 2020-21 वर्षाकरिता जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करणेबाबत, पाटबंधारे विभागाचा कामकाज आढावा, जलसंधारण विभागाचा कामकाज आढावा बैठक. दुपारी 1.30 वाजता भूसंपादन- नगर-परळी रेल्वे अतिरिक्त भूसंपादन आढावा, नॅशनल हायवे आढावा, कलम 18 व 28 प्रलंबित भूसंपादन आढावा, विविध विभागांमार्फत भूसंपादन देय मागणी बाबत आढावा बैठक. दुपारी 2.30 वाजता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा व सार्वजनिक मालमत्ता नुकसानीचा आढावा, सन 2018 व त्यापुर्वी पात्र शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा मिळाला नसल्याबाबत आढावा, महसूल मंडळ निहाय पिक कापणी अहवालाबाबत आढावा बैठक. दुपारी 3.30 वाजता रोजगार हमी योजना विभागाच्या कामकाजाची आढावा बैठक. दुपारी 4.00 वाजता बीड नगर परिषद विविध योजना व विकास कामाची आढावा बैठक.

*-*-*-*-*-*-*-*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!