प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:पदवीधर निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन!

पदवीधर निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन!



• _सर्वांनी उपस्थित रहावे- लक्ष्मण पौळ, बाजीराव भैय्या धर्माधिकारी_ •


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......

       विधान परिषदेसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आज दि.५ रोजी महत्त्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

          विधान परिषदेसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषित झाली असून 1 डिसेंबर रोजी मतदान संपन्न होणार आहे.या निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा कालावधी अत्यल्प असल्याने आपल्या उमेदवाराच्या प्रचाराच्या पूर्वतयारीसाठी व जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तालुक्याची महत्वपूर्ण बैठक राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या "जगमित्र' संपर्क कार्यालयात  गुरुवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता आयोजित केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व  नगरसेवक, जि.प.सदस्य, पं.स. सदस्य,गणप्रमुख,गटप्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या