पोस्ट्स

MB NEWS-रेल्वेखाली एकाचा मृत्यू; मुंडके व धड झाले वेगळे

इमेज
  रेल्वेखाली एकाचा मृत्यू; मुंडके व धड झाले वेगळे घाटनांदुर, प्रतिनिधी....        घाटनांदुर रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी एकाचा रेल्वे पटरीवर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये मुंडके व धड वेगळे झाले आहे. मयत इसमाने आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.         सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जाणारी पूर्ण हैदराबाद रेल्वे घाटनांदुर वरून गेल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर एका इसमाचे  मुंडके व धड पटरीवर कटून पडल्याचे दिसून आले. ही घटना पाहता मयत इसमाने आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान हा मयत दिग्रस जि.उदगिर येथील असून गणेश माने असे त्याचे नाव असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

MB NEWS-अमरनाथ यात्रेहून परळीत आगमन: निळकंठ चाटे यांचा सत्कार

इमेज
  अमरनाथ यात्रेहून परळीत आगमन: निळकंठ चाटे यांचा सत्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     अमरनाथ यात्रेहून परळीत आगमन झाल्यानंतर निळकंठ चाटे यांचा सत्कार करण्यात आला.      भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष  निळकंठ चाटे हे  अमरनाथ बाबांचे दर्शन करून सुखरूप यात्रा करुन आले. अमरनाथ यात्रेहून परळीत आगमन झाल्यानंतर निळकंठ चाटे यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवुन सत्कार करण्यात आला.यावेळी युवा कार्यकर्ते दिपक नागरगोजे, विशाल कराड, आकाश मुंडे तुकाराम गुट्टे आदी उपस्थित होते.

MB NEWS-न.प.कर्मचारी संजय जाधव यांना बंधुशोक;अशोक जाधव यांचे निधन

इमेज
न.प.कर्मचारी संजय जाधव यांना बंधुशोक;अशोक जाधव यांचे निधन  परळी वैजनाथ प्रतिनिधी) :-            परळी शहरातील इंदिरानगर, कन्या शाळा रोड भागातील रहिवाशी अशोक हनुमंतराव जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समय 70 वर्ष वयाचे होते. नगरपरिषद कर्मचारी संजय हनुमंतराव  जाधव यांचे ते मोठे बंधू होत.           अशोक हनुमंतराव जाधव हे अतिशय धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना व वैद्यनाथ सहकारी साखर कारखानेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. सर्वपरिचित असे ते व्यक्तिमत्व होते. अशोक जाधव यांच्या पाश्चात दोन मुले एक मुलगी व भाऊ, बहिणी, नातवंडे असा परिवार आहे. 

MB NEWS- कै. मिराताई गोविंद शिनगारे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

इमेज
 कै. मिराताई गोविंद शिनगारे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण  केज,प्रतिनिधी...        दि. १६ जुलै रोजी ग्रामशक्ती वेल्फेअर फौंडेशन क्रांतीनगर अंबाजोगाई येथील संस्थेच्या नियोजित वृद्धाश्रमाच्या  प्रांगणामध्ये नुकतेच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी बीड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव गायकवाड, ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई चे अध्यक्ष ज्योतीराम सोनके, दैनिक प्रतिवीरचे पत्रकार गोविंद शिनगारे, जिजामाता ज्ञान मंदिर चंदन सावरगाव च्या संचालिका श्रीमती. आर.एस शिनगारे, संतोष शिनगारे, जय खाडप, कुमारी शौर्या शिनगारे, सयी शिनगारे,सानू शिनगारे यांच्या हस्ते दहा वृक्षांचे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.     ग्राम शक्ती वेलफेअर फाउंडेशन अंबाजोगाई च्या वतीने एक एकर परिसरामध्ये विविध  प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन देणाऱ्या विविध वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. अंबाजोगाई परिसरामध्ये सामाजिक कार्याचा वसा हाती घेऊन अविरतपणे कार्य करत असलेली संस्था ग्राम शक्ती फाउंडेशन अंबाजोगाई संस्थापक अध्यक्ष ज्योतीराम सोनके यांच्या नेतृ

MB NEWS-फसवणूक >>> मालक राहिला बाजूलाच: बनावट मालक उभा करत बनावट कागदपत्रे देवून 3 हेक्टर 55 आर जमीनीचे केले खरेदीखत !

इमेज
  फसवणूक >>> मालक राहिला बाजूलाच: बनावट मालक उभा करत बनावट कागदपत्रे देवून 3 हेक्टर 55 आर जमीनीचे केले खरेदीखत ! परळी वैजनाथ प्रतिनिधी...        शेतजमीन नावावर करून घेताना व त्याचे खरेदीखत करताना सर्व पडताळण्या केल्या जातात. तसेच लिहून देणार, लिहून घेणार, साक्षीदार, शपथपत्रे, बायोमेट्रिक ओळख पटवणे, आधार कार्ड, वकील अशा सविस्तर प्रक्रियेतून खरेदी खताची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात होते. मात्र यातूनही फसवणुकीचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मूळ जमीन मालक बाजूलाच राहिला व त्याच्या जागी बनावट मालक उभा करत बनावट कागदपत्रे तयार करून निबंध कार्यालयात सादर करत सर्व पडताळण्या पूर्ण करून तीन हेक्टर 55 आर जमिनीचे खरेदीखत झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी दुय्यम उपनिबंधक परळी यांनीच आता पोलिसात बेकायदेशीर व अनाधिकृतरित्या खरेदीखत दस्तनोंदणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.       याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार , परळी येथील दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालयातील प्रभारी दुय्यम निबंधक नईम अहमद शेख यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या सविस्तर फ

MB NEWS-भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट

इमेज
भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट जन्मदिनाच्या निमित्ताने शास्त्रींनी धनंजय मुंडेंना संत भगवानबाबांची प्रतिमा भेट देत दिले आशीर्वाद परळी (दि. 17) - भगवानगडाचे महंत ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मुंडेंच्या परळी येथील पंढरी या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट दिली.  यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी नुकताच पार पडलेल्या धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त श्री. मुंडे यांना संत भगवानबाबा यांची भव्य प्रतिमा भेट देऊन आशीर्वाद दिला. याप्रसंगी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती रुक्मिणीबाई मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, प्रा. निलेश आघाव आदी उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी देखील मुंडे कुटुंबाच्या वतीने महंत नामदेव शास्त्री यांचे स्वागत करत आशीर्वाद घेतले. आज सकाळीच संतांचे दर्शन थेट घरी लाभले, संतांच्या सान्निध्यात ईश्वर प्राप्ती होते, असा आशय सांगणाऱ्या 'संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला...' या अभंगवणीचा प्र

MB NEWS-अज्ञात वाहनाच्या धडकेत ऊसतोड मजुरांचा मृत्यू

इमेज
अज्ञात वाहनाच्या धडकेत ऊसतोड मजुरांचा मृत्यू परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      अज्ञात वाहनाच्या धडकेत गोवर्धन हिवरा येथील ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सिरसाळा येथे घडली असून या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दि 14 रोजी सिरसाळा येथील आठवडी बाजारातील सरकारी धान्य गोडवानाचे समोरील रोडवर बालु रामा राठोड (वय ३० वर्षे) हे पायी चालत असतांना अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरगाव वेगाने हायगयीने व निष्काळजिपणे चालवुन त्यास जोराची धडक देवुन गंभिर जखमी केले.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी मरणास कारणीभुत म्हणुन सिरसाळा पोलीस ठाण्यात गुरन १२६ / २०२२कलम २७९, ३३७,३३८,३०४(अ) भा.द.वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MB NEWS-दिव्य ज्योति जाग्रती संस्थानचा परळीत आज गुरूपोर्णिमा उत्सव

इमेज
  दिव्य ज्योति जाग्रती संस्थानचा परळीत आज गुरूपोर्णिमा उत्सव परळी/प्रतिनिधी दिव्य ज्योति जाग्रती संस्थान शाखा लातूरच्या वतीने परळी वैजनाथ येथे आज रविवार दि.17 जुलै रोजी सकाळी 9 वाजता गुरू पोर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या प्रेरणेतून परळी वैजनाथ येथे आज रविवार दि.17 जुलै रोजी सकाळी 9 वाजता हालगे गार्डन, वैद्यनाथ मंदिरजवळ, दिव्य ज्योति जाग्रती संस्थानचा गुरू पोर्णिमा उत्सव होणार आहे. या कार्यक्रमात सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या प्रेरणेतून दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने प्रवचन, संकीर्तन तसेच विविध धार्मीक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दिव्य ज्योति जाग्रती संस्थान परळीच्या वतीने करण्यात येत आहे.

MB NEWS-पंकजाताई मुडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंच्या मागणीप्रमाणे परळीचा उड्डाणपूल तसेच चौपदरीकरणाला १०० कोटीचा निधी

इमेज
  पंकजाताई मुडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंच्या मागणीप्रमाणे  परळीचा  उड्डाणपूल तसेच चौपदरीकरणाला १०० कोटीचा निधी विकासकामांना वेळोवेळी निधी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे पंकजाताईंनी मानले आभार बीड ।दिनांक १६।  परळी शहरातील डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरण यासाठी शंभर कोटी रूपयाचा निधी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. याबद्दल पंकजाताईंनी ट्विट करत गडकरी यांचे आभार मानले आहेत.       परळी शहरातील वाहतुकीची कोंडी सुटावी यासाठी सध्याच्या डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलासह आणखी एक उड्डाणपूल असावा तसेच त्याचे चौपदरीकरण करावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे यापूर्वीच केलेली आहे. जिल्हयाच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी  अंबाजोगाई- लातूर दरम्यानच्या बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरण करावे व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्

MB NEWS-महाराजांची शिकवण सतत आम्हाला सन्मार्ग दाखवत राहील -धनंजय मुंडे

इमेज
  पाटांगणकर महाराज यांच्या पार्थिवाचे धनंजय मुंडे यांनी घेेतलं अंत्यदर्शन  महाराजांची शिकवण सतत आम्हाला सन्मार्ग दाखवत राहील -धनंजय मुंडे बीड येथील संत जनीजनार्धन संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.धुंडीराजशास्त्री पाटांगणकर महाराज यांच्या पार्थिवाचे आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाराजांनी अध्यात्माच्या मार्गाने शिकवलेली मानवतेची शिकवण सतत आम्हाला सन्मार्ग दाखवत राहील अशी भावना यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली,  यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार सय्यद सलीम,  नारायण शिंदे,  कल्याण आखाडे, दादासाहेब मुंडे, प्रशांत चौरे आदी होते.

MB NEWS-राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांनी पंकजाताई मुंडेंना सोबत घेत केला छत्तीसगड, मध्यप्रदेशचा दौरा

इमेज
  राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू  यांनी पंकजाताई मुंडेंना सोबत घेत केला छत्तीसगड, मध्यप्रदेशचा दौरा दौऱ्यानंतर  मूर्मू यांनी ट्विट करत केली पंकजाताईंची प्रशंसा ! मुंबई  ।दिनांक१६। राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या  उमेदवार श्रीमती द्रोपदी मुर्मू सध्या विविध राज्याचा दौरा करत आहेत. मुर्मू यांनी नुकताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना सोबत घेत छत्तीसगड, मध्यप्रदेशचा दौरा केला. दौरा संपल्यानंतर मुर्मू यांनी ट्विट करत त्यांचं खास कौतुक केलं.     भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू गुरूवारी (ता. १४) मुंबईत आल्या होत्या. विमानतळावर भाजपच्या वतीनं त्यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनीही त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर मूर्मू यांनी पुढील राज्याचा दौरा करण्यासाठी पंकजाताईंना आपल्या समवेत घेतले. दि. १४ व १५ रोजी छत्तीसगड आणि मध्यप्रदेशचा त्यांचा दौरा पार पडला. मध्यप्रदेशच्या सह प्रभारी या नात्याने पंकजाताईंनी भोपाळमध्ये त्यांच्यासोबत होत्या. याठिकाणी मुर्मू यांचं जोरदार स्वागत झालं. या स्वाग

MB NEWS-धुंडिराज शास्त्री पाटांगणकर महाराजांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी* *पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*

इमेज
  धुंडिराज शास्त्री पाटांगणकर महाराजांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना बीड  ।दिनांक १६। अध्यात्मिक क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्व धुंडिराज शास्त्री महाराज पाटांगणकर यांच्या निधनाने जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.    धुंडिराज शास्त्री महाराजांच्या  निधनाची बातमी सायंकाळी कानावर आली आणि धक्काच बसला. महाराजांचे अध्यात्मिक क्षेत्रातील योगदान मोठे होते. पन्नास वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रात कार्यरत होते.  लोकनेते गोपीनाथराव मुंडे व परिवाराशी त्यांचा विशेष स्नेह होता. अनेक वेळा त्यांचेशी संवाद साधण्याचा योग आला, विविध विषयांवर ते मनमोकळे बोलायचे. आयुर्वेदाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक तसेच आयुर्वेद क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली अशा शब्दांत पंकजाताईंनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. ••••

MB NEWS-धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश;नितीन गडकरींनी परळीसाठी 100 कोटी केले मंजूर

इमेज
  धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश;नितीन गडकरींनी परळीसाठी 100 कोटी केले मंजूर   श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलासह दुसऱ्या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरणासाठी नितीन गडकरींनी केले 100 कोटी मंजूर!* *दोन्ही उड्डाणपूल 4 पदरी होणार; लवकरच होणार निविदा प्रसिद्ध* *अंबाजोगाई लातूर रोडवरील बीड जिल्हा हद्दीतील रस्ताही होणार चौपदरी, केंद्राने मागवले प्रस्ताव* परळी वै. (दि. 16) - माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. 16 जून रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केलेल्या मागणीला मोठे यश आले असून, परळी शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाच्या व थर्मल परिसरातील दुसऱ्या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण कामासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाने 100 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.  निधी मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये रा.मा.548 ब वरील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल चौपदरीकरण व रा.मा.361 एफ वरील परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत प्रकल्पाचे प्रवेशद्वार या रस्त्याचे त्यावरील रेल्वे उड्डाण पुलासह चौपदरीकरण कर

MB NEWS-बीड जिल्ह्याचे अध्यात्मिक वैभव हरवले; धुंडीराज शास्त्री पाटांगणकर महाराजांचे देहावसन

इमेज
बीड जिल्ह्याचे अध्यात्मिक वैभव हरवले; धुंडीराज शास्त्री पाटांगणकर महाराजांचे देहावसन बीड जिल्ह्याच्या आध्यात्मिक क्षेत्राला धक्का देणारी बातमी शनिवारी समोर आली.वेदशास्त्रसंपन्न हभप धुंडिराज महाराज पाटांगणकर यांचे वृद्धपकाळाने सायंकाळी निधन झाले.त्यांच्या निधनाने वृत्त समजताच शेकडो भाविक भक्तांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. मूळचे शिक्षक असणारे धुंडिराज महाराज हे वेदशास्त्रसंपन्न होते.आयुर्वेद या विषयात त्यांचा गाढा अभ्यास होता.दुर्धर आजारावर त्यांचे निदान अतिशय परफेक्ट होते.संत जनीजनार्दन संस्थान थोरले पाटांगण चे प्रमुख होते. गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून ते अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होते.विद्यावाचस्पती म्हणून त्यांचा नावलौकिक होता.श्रीमद भागवत मुखोदगद असलेले धुंडिराज महाराज हे बीड जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्रातील मैलाचा दगड होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते,शनिवारी सायंकाळी त्यांचे उपचार सुरू असताना निधनझाले.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी,मुलगा,सुना नातवंडे असा परिवार आहे. बीड जिल्ह्याच्या आध्यात्मिक क्षेत्राला धक्का देणारी बातमी शनिवारी समोर आली.वेदश

MB NEWS-रविवारपासून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियानास पुन्हा सुरुवात*

इमेज
  रविवारपासून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियानास पुन्हा सुरुवात *विकासाची प्रभागफेरी घेऊन धनंजय मुंडे रविवारी प्रभाग क्र. 3 (बरकतनगर) भागात घेरोघरी भेटी देऊन साधणार नागरिकांशी संवाद* परळी (दि. 16) - राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केलेले 'राष्ट्रवादी आपल्या दारी... विकासाची प्रभागफेरी' हे अभियान रविवार पासून (दि. 17) पुन्हा सुरू करण्यात येत असून, धनंजय मुंडे हे आपल्या सहकारी - पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून परळी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील बरकत नगर भागातील घरोघरी जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत.  धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील नागरिकांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केल्यानंतर त्याला परळीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. मात्र मध्यंतरी आचार संहिता घोषित झाल्याने या उपक्रमास खंड पडला होता. मात्र धनंजय मुंडे यांनी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात हा उपक्रम पुन्हा सुरू करणार असल्याचे शुक्रवारी घोषित केले. दरम्यान रविवारी सकाळ

MB NEWS-श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांचे दुःखद निधन

इमेज
  श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांचे दुःखद निधन परळी वै.... प्रभाकर व रामभाऊ देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने आज शुक्रवार दि.15 जुलै रोजी राञी 9 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख या अतिषय धार्मिक व सुस्वभावी होत्या,काही दिवसापासुन त्या आजार होत्या त्यांच्यावर उपचार पण सुरु होते परंतु त्यांच्या  वयाच्या 84 व्यावर्षी त्यांची प्राणजोत माळवली.त्यांच्या जाण्याने सर्वस्तरातुन शोकभावना व्यक्त होत आहेत. माजी नगरसेवक  बाळासाहेब देशमुख यांच्या त्या काकी होत,श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांच्यावर शनिवार दि.16 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सार्वजनिक स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार असा मोठा परिवार आहे.देशमुख परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे

MB NEWS-परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के भरला(Video & News)

इमेज
  परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के  भरला परळी वैजनाथ | एमबी न्युज वृत्तसेवा..         परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडी येथील 'बोरणा' मध्यम प्रकल्प  १०० टक्के  भरला आहे. तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परळी चा मुख्य जलस्त्रोत असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात यापुर्वीच १०० पाण्याचा साठा झालेला आहे व सध्यस्थितीत पाण्याचा मोठा ओघ सुरू आहे.                   परळी तालुक्यात चांगला  पाऊस  झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील  'वाण प्रकल्प' पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तालुक्यातील बोधेगाव, करेवाडी, चांदापुर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपुर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, करेवाडी आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होण्यास सुरुवात झाली आहे.  बोरणा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी प्रवाहित ....    दरम्यान परळी पासून जवळच असलेल्या नंदनज-कासारवाडी येथील बोरणा तलावात 100 टक्के  पाणीसाठा झाला  आहे.मध्यम प्रकल्प असलेल्या बोरणा प्र

MB NEWS-सत्ता असो वा नसो सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच खरी शक्ती -धनंजय मुंडे

इमेज
  सत्ता असो वा नसो सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच खरी शक्ती -धनंजय मुंडे  धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो समर्थकांनी केले वृक्षारोपण धनंजय मुंडे यांच्या जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळ्यास हजारो कार्यकर्त्यांची गर्दी;आईंनी केलं औक्षण तर प्रभू वैद्यनाथांचे घेतले दर्शन परळी (दि. 15) - माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या आवाहनाला त्यांच्या समर्थकांनी जोरदार प्रतिसाद देत राज्यात हजारो ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याचे फोटो पाठवले आहेत.   2019 च्या निवडणुकीत मला जनतेने अभूतपूर्व प्रेम देऊन निवडून दिले, त्यांच्याच आशीर्वादाने मी मंत्री झालो. अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर राज्यात सत्तांतर झाले असले तरी माझ्यासाठी सत्ता असणे किंवा नसणे हे कधीच महत्वाचे नाही. माझ्या पाठीशी असलेले सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच माझी खरी शक्ती असून मी सदैव जनसेवेत राहण्यासाठी कटीबद्ध आहे, असे मत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.  आज परळी येथे धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बो

MB NEWS-नीट परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीपला अपघात : दोन विद्यार्थी व दोन पालक जखमी

इमेज
  नीट परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीपला अपघात : दोन विद्यार्थी व दोन पालक जखमी केज (दि.१५) :- परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील विद्यार्थी हे त्यांच्या पालका सोबत अहमदनगर येथे नीटच्या परीक्षेसाठी जात असताना अंबाजोगाई-केज रस्त्यावर होळ नजीक त्यांच्या गाडीला अपघात होऊन पलटी झाली. त्यात दोन विद्यार्थी व दोन पालक असे चौघे जखमी झाले आहेत.       दि. १५ जुलै शुक्रवार रोजी पाथरी जि. परभणी येथील सुरेश सिरसाट वय (५० वर्ष), विनोद सिरसाट वय (४२ वर्ष), सौरभ सिरसाट वय ( १९ वर्ष ) आणि सुजित सिरसाट वय (१८वर्ष) व अन्य एकजण असे पाचजण अहमदनगर येथे नीट परीक्षेसाठी बोलेरो गाडीतून जात होते. त्यांची गाडी केजच्या दिशेने होळ पासून पुढे आली असता होळ ते चंदनसावरगाव दरम्यान त्यांची बोलेरो गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातमध्ये सौरभ सिरसाट वय (१९ वर्ष) आणि सुजित सिरसाट वय (१८वर्ष) हे दोन विद्यार्थी व सुरेश सिरसाट वय (५० वर्ष) आणि विनोद सिरसाट वय (४२ वर्ष) हे दोन पालक जखमी झाले आहेत.जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे आपत्

MB NEWS:- धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन:एका क्लिकवर विविध लेख, बातम्या,अभिष्टचिंतन जाहिराती

इमेज
धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन:एका क्लिकवर विविध लेख, बातम्या, अभिष्टचिंतन जाहिराती.....       राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे माजी पालकमंत्री आ. धनंजय मुंडे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अग्रभागी असलेले नेतृत्व. दातृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वाचा अनोखा संगम असलेले व्यक्तिमत्त्व आहे. १५ जुलै आ.धनंजय मुंडे यांचा वाढदिवस.यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! - -      -संपादक _______________________________ _______________________________ वाल्मीक (अण्णा) कराड यांचा लेख >>>>>> धनंजय मुंडे: माझे दैवत...! https://bit.ly/3IS5qbD _______________________________ ■ आ.धनंजयजी मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन जाहिरात >>>>>>  वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. https://youtu.be/ujNipqG725A _______________________________ ● मा.आ.श्री. धनंजयजी मुंडे साहेब वाढदिवस अभिष्टचिंतन जाहिरात.     >>>>>>>>> अजय मुंडे(गटनेते जि.प.बीड)* अभय मुंडे (युवानेते रा. काँ.परळी वै.) h

MB NEWS-आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा

इमेज
  आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा परळी वैजनाथ.... दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते कर्नाटक राज्यातील हुबळी दरम्यान विशेष गाड्या सुरु करण्याचे ठरवले आहे. या विशेष गाडीच्या सहा फेऱ्या मंजूर करण्यात आल्या असून, नांदेड तिरुपती दरम्यान चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा ही निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड- तिरुपती विशेष सेवा           गाडी क्रमांक 07633 ही गाडी 16 आणि 23 जुलै रोजी शनिवारी दुपारी 12.00 वाजता सुटेल. आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुती, तादिपात्री, येर्रागुंतला, कडप्पा, रेनिगुंता मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 8.30 वाजता पोहोचेल. तिरुपती-नांदेड विशेष सेवा गाडी क्रमांक 07634 ही गाडी 17 आणि 24 जुलै रोजी रविवारी रात्री 9.00 वाजता सुटेल. आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी 5.20 वाजता सुटेल. या गाडीत प्रथम श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वा

MB NEWS-नांदेड- पंढरपूर-हुबळी परळीमार्गे नवीन रेल्वे

इमेज
  नांदेड- पंढरपूर-हुबळी परळीमार्गे नवीन रेल्वे परळी वैजनाथ.....       दिनांक 16 जुलै, शनिवार पासून परळीमार्गे नांदेड-हुबळी दरम्यान नवीन साप्ताहिक विशेष रेल्वे धावणार आहे. नांदेड-पंढरपूर-हुबळी रेल्वे नांदेड येथून दर शनिवारी दुपारी 2.10 वाजता निघून पूर्णा 2.40, परभणी 3.15, गंगाखेड 3.50, परळी वैजनाथ सायंकाळी 4.40, पुढे लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्सी, कुर्डवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा जंक्शन, धारवाड स्थानकावरून  हुबळी येथे दुसर्या दिवशी सकाळी 9 ला पोहोचणार आहे. परतीत हुबळी येथून दर रविवारी सकाळी 11.15 ला निघून त्याच मार्गाने परळी वैजनाथ दूसरा दिवशी सकाळी 3.45, गंगाखेड 5.05, परभणी 5.45 पूर्णा 6.35 आणि अखेर नांदेड येथे सकाळी 8 ला पोहोचणार आहे. Click &watch: *आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा* घोषित नांदेड-हुबळी रेल्वेमुळे धाराशिव येथून 17 किमी अंतरावरील तुळजापूर, पंढरपूर, मिरज येथून 40 किमी अंतरावरील कोल्हापूर महालक्ष्मी, हुबळी येथून  गोकर्णा, मुरुडेश्वर येथील मंदिरांच्या दर्शनासाठी  जाणार्या भक्तांसाठी, तसेच लोंढा जंक्शन येथून 4 तासाच्या

MB NEWS-वारीला गेलेल्या बळीराम राऊत यांचे अपघाती निधन

इमेज
  वारीला गेलेल्या बळीराम राऊत यांचे अपघाती निधन सातोना/पांडुरंग शिंदे....     परतुर तालुक्यातील अंगलगाव येथील बळीराम काशिनाथ राऊत यांचे अपघाती निधन झाले आहे. पंढरपूर येथे वारीहून परतत असताना पंढरपूर येथील पोलीस स्टेशन समोर अचानक येणाऱ्या भरधाव कार ने धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला होता. पंढरपूर येथील खाजगी  रुग्णालयात दोन दिवस उपचार सुरू होते. दरम्यान दि. 13 जुलै रोजी रात्री दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांचा अंत्यविधी अंगलगाव येथे दिनांक 14 जुलै रोजी करण्यात आला. त्यांच्या  निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.बळीराम राऊत हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने सर्व परिचित होते.         त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. राऊत कुटुंबाच्या दु:खात माजी आमदार बबनराव लोणीकर  सहभागी झाले. त्यांनी शोक व्यक्त केला. तसेच पदाधिकारी पत्रकार पांडुरंग शिंदे, भाजप कार्यकर्ते रंगनाथ.रेंगे पाटील,  सरपंच आप्पासाहेब खंदारे, शांतारामजी शिंदे ,रामप्रसाद शिंदे, निवृत्ती शिंदे  यांनी शोक व्यक्त केला आहे. 

MB NEWS-सुधीर सांगळे, बीड यांचा लेख>>>>कठीण काळातले सक्षम पालकत्व हा जिल्हा कायम ध्यानात ठेवेल

इमेज
  कठीण काळातले सक्षम पालकत्व हा जिल्हा कायम ध्यानात ठेवेल घरातल्या लहान लेकराला शेजाऱ्याच्या लेकरसोबत खेळायला जायची सुद्धा परवानगी नाही, ना आपण जाऊ देणार, ना समोरचा घरात येऊ देणार...! कोविडच्या अशा निर्दयी संकट काळात एकीकडे घरात बसून करमत नव्हतं, गरिबाला परवडत नव्हतं पण शेवटी जीवपुढं काही मोठंही नव्हतं; म्हणून घरात बसून राहण्याशिवाय पर्यायही नव्हता! अशी विचित्र अवस्था जगात कधी कुणी पाहिली नसावी... ती तुम्ही-आम्ही पाहिली आणि जगली सुद्धा. कोविडची चाहूल लागली आणि भारत देश अचानक लॉक डाऊन करण्यात आला. कोणालाही याचा पूर्वानुभव नव्हता, कसलंही नियोजन माहीत नव्हतं! बस जशी परिस्थिती येईल तसतसा निर्णय घेत जायचं, असंच एकंदरीत शासकीय निर्णयांमध्ये होणारे बदल बघून दिसून येत होतं. महाराष्ट्रात-बीड जिल्ह्यात देखील फार काही वेगळी परिस्थिती नव्हती. वेगळा होता तो इथला पालकमंत्री, अगदी नवखा आणि काहींच्या मते अनुभव नसलेला - धनंजय मुंडे! राज्यात सत्तांतर होऊन अवघे दोनच महिने झाले होते आणि नव्या सरकारने पहिला-वहिला अर्थसंकल्प मांडला होता. राज्याच्या वाढप्याचे जिल्ह्याच्या पालकांशी अत्यंत जवळचे सख्य असल्यान

MB NEWS-*पंकजाताई मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार*

इमेज
 * थेट जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडीचा निर्णय स्वागतार्ह*  *पंकजाताई मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार* मुंबई ।दिनांक १४। राज्यातील नगरपरिषदांचे नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सरपंच आता थेट जनतेतून निवडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले आहे. हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.     थेट जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवडीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला होता. आता नव्याने सत्तारूढ झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने हा निर्णय पुन्हा घेतला आहे. सरकारच्या या जनहिताच्या निर्णयाचे पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले आहे. "डायरेक्ट लोकांतून सरपंच व नगराध्यक्षाची निवडणूक होणार.. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे आणि पूर्वी मी ग्रामविकास मंत्री असताना लोकप्रिय असा हा निर्णय होता" असं ट्विट करत पंकजाताईंनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. ••••