इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-बीड जिल्ह्याचे अध्यात्मिक वैभव हरवले; धुंडीराज शास्त्री पाटांगणकर महाराजांचे देहावसन

बीड जिल्ह्याचे अध्यात्मिक वैभव हरवले; धुंडीराज शास्त्री पाटांगणकर महाराजांचे देहावसन

बीड जिल्ह्याच्या आध्यात्मिक क्षेत्राला धक्का देणारी बातमी शनिवारी समोर आली.वेदशास्त्रसंपन्न हभप धुंडिराज महाराज पाटांगणकर यांचे वृद्धपकाळाने सायंकाळी निधन झाले.त्यांच्या निधनाने वृत्त समजताच शेकडो भाविक भक्तांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

मूळचे शिक्षक असणारे धुंडिराज महाराज हे वेदशास्त्रसंपन्न होते.आयुर्वेद या विषयात त्यांचा गाढा अभ्यास होता.दुर्धर आजारावर त्यांचे निदान अतिशय परफेक्ट होते.संत जनीजनार्दन संस्थान थोरले पाटांगण चे प्रमुख होते.

गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून ते अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होते.विद्यावाचस्पती म्हणून त्यांचा नावलौकिक होता.श्रीमद भागवत मुखोदगद असलेले धुंडिराज महाराज हे बीड जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्रातील मैलाचा दगड होते.

गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते,शनिवारी सायंकाळी त्यांचे उपचार सुरू असताना निधनझाले.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी,मुलगा,सुना नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट