MB NEWS-पंकजाताई मुडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंच्या मागणीप्रमाणे परळीचा उड्डाणपूल तसेच चौपदरीकरणाला १०० कोटीचा निधी
पंकजाताई मुडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंच्या मागणीप्रमाणे परळीचा उड्डाणपूल तसेच चौपदरीकरणाला १०० कोटीचा निधी
विकासकामांना वेळोवेळी निधी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे पंकजाताईंनी मानले आभार
बीड ।दिनांक १६।
परळी शहरातील डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरण यासाठी शंभर कोटी रूपयाचा निधी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. याबद्दल पंकजाताईंनी ट्विट करत गडकरी यांचे आभार मानले आहेत.
परळी शहरातील वाहतुकीची कोंडी सुटावी यासाठी सध्याच्या डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलासह आणखी एक उड्डाणपूल असावा तसेच त्याचे चौपदरीकरण करावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे यापूर्वीच केलेली आहे. जिल्हयाच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी अंबाजोगाई- लातूर दरम्यानच्या बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरण करावे व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही केलेली होती. या दोन्ही मागण्या मान्य करून गडकरी यांनी त्यासाठी शंभर कोटीचा निधी मंजूर केला आहे.
*गडकरींचे आभार*
--------------
परळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुल व छ.संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत केंद्र रस्ता व त्यावरील रेल्वे उड्डाणपूल चौपदरीकरण या दोन कामांना आमच्या मागणी प्रमाणे 100 कोटी रुपये मंजूर करून आमच्या मतदारसंघातील विकासामध्ये वेळोवेळी निधी दिल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांनी नितीनजी गडकरी यांचे आभार मानले आहेत.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा