MB NEWS-राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांनी पंकजाताई मुंडेंना सोबत घेत केला छत्तीसगड, मध्यप्रदेशचा दौरा

 राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू  यांनी पंकजाताई मुंडेंना सोबत घेत केला छत्तीसगड, मध्यप्रदेशचा दौरा

दौऱ्यानंतर  मूर्मू यांनी ट्विट करत केली पंकजाताईंची प्रशंसा !



मुंबई  ।दिनांक१६।

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या  उमेदवार श्रीमती द्रोपदी मुर्मू सध्या विविध राज्याचा दौरा करत आहेत. मुर्मू यांनी नुकताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना सोबत घेत छत्तीसगड, मध्यप्रदेशचा दौरा केला. दौरा संपल्यानंतर मुर्मू यांनी ट्विट करत त्यांचं खास कौतुक केलं.

    भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू गुरूवारी (ता. १४) मुंबईत आल्या होत्या. विमानतळावर भाजपच्या वतीनं त्यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनीही त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर मूर्मू यांनी पुढील राज्याचा दौरा करण्यासाठी पंकजाताईंना आपल्या समवेत घेतले. दि. १४ व १५ रोजी छत्तीसगड आणि मध्यप्रदेशचा त्यांचा दौरा पार पडला. मध्यप्रदेशच्या सह प्रभारी या नात्याने पंकजाताईंनी भोपाळमध्ये त्यांच्यासोबत होत्या. याठिकाणी मुर्मू यांचं जोरदार स्वागत झालं. या स्वागताने त्या भारावून गेल्या, तसा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला. 


दौऱ्यात पंकजाताईंची प्रशंसा

-----------------

श्रीमती मूर्मू यांच्यासोबतचा दौरा खूपच भावला. त्यांचा सरळ स्वभाव आणि स्वाभिमानी बाण्याने प्रभावित झाले, त्यांचेकडून खूप शिकण्यासारखं आहे असं ट्विट करत पंकजाताईंनी दौऱ्याचा आपला अनुभव सांगितला तर द्रोपदी मूर्मू यांनी " पंकजा जी आपसे मिलकर खुशी हुई " असं ट्विट करत त्यांचं खास कौतुक केलं.  

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार