इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट

भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट

जन्मदिनाच्या निमित्ताने शास्त्रींनी धनंजय मुंडेंना संत भगवानबाबांची प्रतिमा भेट देत दिले आशीर्वाद

परळी (दि. 17) - भगवानगडाचे महंत ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मुंडेंच्या परळी येथील पंढरी या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट दिली. 


यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी नुकताच पार पडलेल्या धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त श्री. मुंडे यांना संत भगवानबाबा यांची भव्य प्रतिमा भेट देऊन आशीर्वाद दिला. याप्रसंगी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती रुक्मिणीबाई मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, प्रा. निलेश आघाव आदी उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांनी देखील मुंडे कुटुंबाच्या वतीने महंत नामदेव शास्त्री यांचे स्वागत करत आशीर्वाद घेतले. आज सकाळीच संतांचे दर्शन थेट घरी लाभले, संतांच्या सान्निध्यात ईश्वर प्राप्ती होते, असा आशय सांगणाऱ्या 'संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला...' या अभंगवणीचा प्रत्यक्ष प्रत्यय आला असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या