इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश;नितीन गडकरींनी परळीसाठी 100 कोटी केले मंजूर

 धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश;नितीन गडकरींनी परळीसाठी 100 कोटी केले मंजूर



 श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलासह दुसऱ्या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरणासाठी नितीन गडकरींनी केले 100 कोटी मंजूर!*


*दोन्ही उड्डाणपूल 4 पदरी होणार; लवकरच होणार निविदा प्रसिद्ध*


*अंबाजोगाई लातूर रोडवरील बीड जिल्हा हद्दीतील रस्ताही होणार चौपदरी, केंद्राने मागवले प्रस्ताव*


परळी वै. (दि. 16) - माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. 16 जून रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केलेल्या मागणीला मोठे यश आले असून, परळी शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाच्या व थर्मल परिसरातील दुसऱ्या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण कामासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाने 100 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. 


निधी मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये रा.मा.548 ब वरील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल चौपदरीकरण व रा.मा.361 एफ वरील परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत प्रकल्पाचे प्रवेशद्वार या रस्त्याचे त्यावरील रेल्वे उड्डाण पुलासह चौपदरीकरण करणे ही दोन कामे समाविष्ट असून यासाठी 100 कोटी रुपये याच आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आले आहेत. या दोनही कामांची लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, आ. धनंजय मुंडे यांनी समस्त परळी वासीयांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. 


माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी 16 जुन रोजी नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन यासंदर्भात मागणी केली होती. परळी शहरातील दोन्ही रेल्वे उड्डाणपूल हे रहदारीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे असून, अनेक वर्षांपासुन हे उड्डाणपूल विस्ताराच्या प्रतीक्षेत होता. या रेल्वे उड्डाणपुलाचे चौपदरीकरण झाल्याने धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीतील आणखी एका वचनाची पूर्ती देखील होणार आहे. 


दरम्यान अंबाजोगाई ते लातूर रस्त्यातील वाघाळा पूल ते लातूर जिल्हा हद्द या 14 किलोमीटर रस्त्याचे काँक्रीट चौपदरीकरण करण्याची मागणी देखील मान्य करण्यात आली असून, केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने याबाबतचा 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत.


धनंजय मुंडे यांनी नितीन गडकरी यांच्या भेटीत या पुलाचे वाहतुकीच्या दृष्टीने असलेले महत्व अधोरेखित करत, चौपदरी विस्तार करण्याची तसेच अंबाजोगाई लातूर रस्ता विस्तारित करण्याची मागणी केली होती, त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील अन्य काही राष्ट्रीय महामार्ग व पुलांच्या विस्तार व दुरुस्तीचीही मागणी केली होती. त्या अन्य मागण्यांना देखील टप्प्याटप्प्याने या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!