MB NEWS-अज्ञात वाहनाच्या धडकेत ऊसतोड मजुरांचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत ऊसतोड मजुरांचा मृत्यू

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
     अज्ञात वाहनाच्या धडकेत गोवर्धन हिवरा येथील ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सिरसाळा येथे घडली असून या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दि 14 रोजी सिरसाळा येथील आठवडी बाजारातील सरकारी धान्य गोडवानाचे समोरील रोडवर बालु रामा राठोड (वय ३० वर्षे) हे पायी चालत असतांना अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरगाव वेगाने हायगयीने व निष्काळजिपणे चालवुन त्यास जोराची धडक देवुन गंभिर जखमी केले.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी मरणास कारणीभुत म्हणुन सिरसाळा पोलीस ठाण्यात गुरन १२६ / २०२२कलम २७९, ३३७,३३८,३०४(अ) भा.द.वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !