इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS-वारीला गेलेल्या बळीराम राऊत यांचे अपघाती निधन

 वारीला गेलेल्या बळीराम राऊत यांचे अपघाती निधन



सातोना/पांडुरंग शिंदे....

    परतुर तालुक्यातील अंगलगाव येथील बळीराम काशिनाथ राऊत यांचे अपघाती निधन झाले आहे. पंढरपूर येथे वारीहून परतत असताना पंढरपूर येथील पोलीस स्टेशन समोर अचानक येणाऱ्या भरधाव कार ने धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला होता. पंढरपूर येथील खाजगी  रुग्णालयात दोन दिवस उपचार सुरू होते. दरम्यान दि. 13 जुलै रोजी रात्री दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांचा अंत्यविधी अंगलगाव येथे दिनांक 14 जुलै रोजी करण्यात आला. त्यांच्या  निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.बळीराम राऊत हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने सर्व परिचित होते. 

       त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. राऊत कुटुंबाच्या दु:खात माजी आमदार बबनराव लोणीकर  सहभागी झाले. त्यांनी शोक व्यक्त केला. तसेच पदाधिकारी पत्रकार पांडुरंग शिंदे, भाजप कार्यकर्ते रंगनाथ.रेंगे पाटील,  सरपंच आप्पासाहेब खंदारे, शांतारामजी शिंदे ,रामप्रसाद शिंदे, निवृत्ती शिंदे  यांनी शोक व्यक्त केला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....