MB NEWS-रेल्वेखाली एकाचा मृत्यू; मुंडके व धड झाले वेगळे

 रेल्वेखाली एकाचा मृत्यू; मुंडके व धड झाले वेगळे





घाटनांदुर, प्रतिनिधी....

       घाटनांदुर रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी एकाचा रेल्वे पटरीवर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये मुंडके व धड वेगळे झाले आहे. मयत इसमाने आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

        सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जाणारी पूर्ण हैदराबाद रेल्वे घाटनांदुर वरून गेल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर एका इसमाचे  मुंडके व धड पटरीवर कटून पडल्याचे दिसून आले. ही घटना पाहता मयत इसमाने आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान हा मयत दिग्रस जि.उदगिर येथील असून गणेश माने असे त्याचे नाव असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !