इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-सत्ता असो वा नसो सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच खरी शक्ती -धनंजय मुंडे

 सत्ता असो वा नसो सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच खरी शक्ती -धनंजय मुंडे 



धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो समर्थकांनी केले वृक्षारोपण



धनंजय मुंडे यांच्या जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळ्यास हजारो कार्यकर्त्यांची गर्दी;आईंनी केलं औक्षण तर प्रभू वैद्यनाथांचे घेतले दर्शन



परळी (दि. 15) - माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या आवाहनाला त्यांच्या समर्थकांनी जोरदार प्रतिसाद देत राज्यात हजारो ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याचे फोटो पाठवले आहेत.  



2019 च्या निवडणुकीत मला जनतेने अभूतपूर्व प्रेम देऊन निवडून दिले, त्यांच्याच आशीर्वादाने मी मंत्री झालो. अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर राज्यात सत्तांतर झाले असले तरी माझ्यासाठी सत्ता असणे किंवा नसणे हे कधीच महत्वाचे नाही. माझ्या पाठीशी असलेले सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच माझी खरी शक्ती असून मी सदैव जनसेवेत राहण्यासाठी कटीबद्ध आहे, असे मत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. 


आज परळी येथे धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. तत्पूर्वी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे यांनी परळी येथील त्यांच्या निवासस्थानी औक्षण करून तोंड गोड करत धनंजय मुंडे यांना आशीर्वाद दिले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. 

Click & watch:एका क्लिकवर: धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन लेख, बातम्या,जाहीराती.

दुपारी शहरातील हालगे गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात राज्याच्या कानाकोपऱ्यातून धनंजय मुंडे प्रेमी कार्यकर्ते, समर्थक, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आदींनी धनंजय मुंडे यांना भेटून शुभेच्छा दिल्या. 


आचार संहिता घोषित होण्यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी आपल्या दारी हे अभियान सुरू केले होते. आचार संहिता रद्द झाल्याने खंडित झालेले अभियान पुन्हा सुरू करून परळी शहर वासीयांना त्यांच्या घरी जाऊन भेटण्याचा उपक्रम पुन्हा सुरू करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमात बोलताना घोषित केले आहे. 


कोणत्याही अपेक्षेविना राज्यभरातून शेकडो किलोमीटर प्रवास करून आलेल्या असंख्य समर्थकांच्या गर्दीत धनंजय मुंडे यांनी जनतेचं प्रेम हीच आपली शक्ती असल्याचे म्हणत, शुभेच्छा व आशीर्वाद देणाऱ्या सर्वांच्या ऋणात राहून जनसेवेचे व्रत कायम जोपासणार असल्याचे आवर्जून नमूद केले. कार्यक्रमास महिलांचीही उपस्थीती लक्षणीय होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....