इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- कै. मिराताई गोविंद शिनगारे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

 कै. मिराताई गोविंद शिनगारे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण 

केज,प्रतिनिधी...

       दि. १६ जुलै रोजी ग्रामशक्ती वेल्फेअर फौंडेशन क्रांतीनगर अंबाजोगाई येथील संस्थेच्या नियोजित वृद्धाश्रमाच्या  प्रांगणामध्ये नुकतेच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी बीड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव गायकवाड, ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई चे अध्यक्ष ज्योतीराम सोनके, दैनिक प्रतिवीरचे पत्रकार गोविंद शिनगारे, जिजामाता ज्ञान मंदिर चंदन सावरगाव च्या संचालिका श्रीमती. आर.एस शिनगारे, संतोष शिनगारे, जय खाडप, कुमारी शौर्या शिनगारे, सयी शिनगारे,सानू शिनगारे यांच्या हस्ते दहा वृक्षांचे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. 

   ग्राम शक्ती वेलफेअर फाउंडेशन अंबाजोगाई च्या वतीने एक एकर परिसरामध्ये विविध  प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन देणाऱ्या विविध वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. अंबाजोगाई परिसरामध्ये सामाजिक कार्याचा वसा हाती घेऊन अविरतपणे कार्य करत असलेली संस्था ग्राम शक्ती फाउंडेशन अंबाजोगाई संस्थापक अध्यक्ष ज्योतीराम सोनके यांच्या नेतृत्वात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करते. यावेळी ग्राम शक्ती वेल्फेअर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, सचिव प्रा. भागवत गोरे, सुरज पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!