MB NEWS-धुंडिराज शास्त्री पाटांगणकर महाराजांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी* *पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*

 धुंडिराज शास्त्री पाटांगणकर महाराजांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी



पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना


बीड  ।दिनांक १६।

अध्यात्मिक क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्व धुंडिराज शास्त्री महाराज पाटांगणकर यांच्या निधनाने जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.


   धुंडिराज शास्त्री महाराजांच्या  निधनाची बातमी सायंकाळी कानावर आली आणि धक्काच बसला. महाराजांचे अध्यात्मिक क्षेत्रातील योगदान मोठे होते. पन्नास वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रात कार्यरत होते.  लोकनेते गोपीनाथराव मुंडे व परिवाराशी त्यांचा विशेष स्नेह होता. अनेक वेळा त्यांचेशी संवाद साधण्याचा योग आला, विविध विषयांवर ते मनमोकळे बोलायचे. आयुर्वेदाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक तसेच आयुर्वेद क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली अशा शब्दांत पंकजाताईंनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार