कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट

इमेज
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे  "मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.    दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ...

MB NEWS-रविवारपासून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियानास पुन्हा सुरुवात*

 रविवारपासून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियानास पुन्हा सुरुवात



*विकासाची प्रभागफेरी घेऊन धनंजय मुंडे रविवारी प्रभाग क्र. 3 (बरकतनगर) भागात घेरोघरी भेटी देऊन साधणार नागरिकांशी संवाद*


परळी (दि. 16) - राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केलेले 'राष्ट्रवादी आपल्या दारी... विकासाची प्रभागफेरी' हे अभियान रविवार पासून (दि. 17) पुन्हा सुरू करण्यात येत असून, धनंजय मुंडे हे आपल्या सहकारी - पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून परळी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील बरकत नगर भागातील घरोघरी जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. 


धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील नागरिकांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केल्यानंतर त्याला परळीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. मात्र मध्यंतरी आचार संहिता घोषित झाल्याने या उपक्रमास खंड पडला होता. मात्र धनंजय मुंडे यांनी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात हा उपक्रम पुन्हा सुरू करणार असल्याचे शुक्रवारी घोषित केले.


दरम्यान रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून माजी मंत्री धनंजय मुंडे हे नवीन प्रभाग क्रमांक 3 मधील बरकत नगर भागात गृहभेटी देणार असून, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध आघाडी व फ्रंटल सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या