पोस्ट्स

उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर व जिल्हा समन्वयक युवासेना प्रा.अतुल दुबे यांचा उपक्रम

इमेज
  शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वारकऱ्यांना मेडिकल किट व अत्यावश्यक वस्तूंचे वितरण उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर व जिल्हा समन्वयक युवासेना प्रा.अतुल दुबे यांचा उपक्रम परळी (प्रतिनिधी) पंढरपूर कडे आषाढी वारीनिमित्त जाणाऱ्या वारकऱ्यांना परळी वैजनाथ येथे आल्यानंतर मेडिकल किट व दैनंदिन अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.19 जुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त हा विशेष उपक्रम उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर व युवासेना जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे यांच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी परळी शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिंडीचे प्रमुख संदीप शास्त्री महाराज यांचाही शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. 19 जुन रोजी शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वारकऱ्यांना आरोग्य किट आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. संत जगमित्र मंदिर येथे हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी बोलत असताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की, वारकरी पंढरपूरच्या दिशेने शेकडो किलोमीटर पायी जात असतात. पांडुरंगाच्या भक्तीची ओढ त्यांना

महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे - भाजपा महिला मोर्चाचं आवाहन

इमेज
  खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत उद्या परळीत योग शिबिर महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे - भाजपा महिला मोर्चाचं आवाहन परळी । दि. २० । भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मोदी@9 महाजनसंपर्क अभियान या उपक्रमाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परळी शहरात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप नेत्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या शिबीरात महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहर भाजपा महिला मोर्चाने केले आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने सत्तेची नऊ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त भारतीय जनता पक्ष महाजनसंपर्क अभियान राबवित आहे, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने भाजपने या उपक्रमाअंतर्गत उद्या २१ जून रोजी   शहरातील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सकाळी ६ वा. खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन होणार आहे. मनाची एकाग्रता आणि शारीरिक आरोग्य सदृढ करणाऱ्या अनेक योग पद्धतींचा अभ्यास आणि  दैनंदिन जीवनात अनुकरण करण्यासाठी अधिकाधिक महिलांनी शिबिरात सहभागी व्हाव
इमेज
  जागृती नागरि सहकारी पतसंस्थेस जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची  सदिच्छा भेट परळी (प्रतिनिधी)...        बीड जिल्ह्याच्या सहकार तथा आर्थिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या परळी वैजनाथ येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या परळी शहरातील मुख्य कार्यालयास आज बीड जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक समृत जाधव तसेच परळी येथील सहाय्यक निबंधक व्ही. एस. जगदाळे यांनी संयुक्तरित्या सदिच्छा भेट दिली.     याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्हाच नव्हे तर सबंध मराठवाड्यात आर्थिक तथा सहकार क्षेत्रामध्ये नावलौकिक असणाऱ्या परळी येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या अरुणोदय मार्केट स्थित मुख्य कार्यालयास आज दिनांक 19 जून 2023 रोजी बीड जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे जिल्हा उपनिबंधक समृत जाधव तसेच परळी उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक उपनिबंधक व्ही. एस. जगदाळे यांनी संयुक्तरित्या सदिच्छा भेट दिली. या सदिच्छा भेटीदरम्यान जागृती ग्रुपचे मुख्य मार्गदर्शक तथा सहकार रत्न प्रा. गंगाधर शेळके सर यांनी जिल्हा उपनिबंधक श्री. समृत जाधव यांचा शाल, श्रीफळ पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन आदर सत्कार केला. यावेळी परळी कार्यालयाचे सहाय्यक निबंधक
इमेज
 ' वैद्यनाथ' कारखान्याच्या अध्यक्षपदी  पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड; व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत कराड अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व नव नियुक्त संचालक गोपीनाथ गडावर नतमस्तक परळी वैजनाथ ।दिनांक १९। वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजाताई मुंडे यांची आज सर्वानुमते बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमन म्हणून चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली.     वैद्यनाथ साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली, यात सर्वच्या सर्व संचालक बिनविरोध निवडून आले होते. आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी जिल्हा उप निबंधक जाधव यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात पंकजाताई मुंडे यांची पुन्हा चेअरमन पदी सर्वानुमते निवड झाली. व्हाईस चेअरमन म्हणून चंद्रकांत कराड यांची निवड झाली.     या बैठकीस संचालक सर्वश्री सतीश मुंडे, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, अजय मुंडे, वाल्मिक कराड, रेशीम नाना कावळे, ज्ञानोबा भगवान मुंडे,  राजेश गिते, पांडूरंग फड,हरिभाऊ गुट्टे,सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड, शिवाजीराव मोरे, सुधाकर सिनगारे, सत्यभामा उत्तमराव आघाव, मं
इमेज
  श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट सचिवपदी प्रा. बाबासाहेब देशमुख परळी : श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या सचिवपदी प्रा. बाबासाहेब वामनराव देशमुख यांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांनी १७ जून रोजी सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. ट्रस्ट विश्वस्तांच्या बैठकीत देशमुख यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीस श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. २००८ ते ११ या तीन वर्षांच्या कालावधीतही देशमुख सचिव होते. त्यांच्याकडे दुसऱ्यांदा ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राजेश देशमुख यांची सचिवपदाची तीन वर्षाची मुदत संपल्याने त्यांच्या जागी बाबासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
इमेज
मराठी मातीतील अस्सल व्यायाम प्रकार: मल्लखांब  ही गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीची! दुस-या बाजीराव पेशव्यांच्या काळातली. मराठी राज्य पानिपतच्या दारुण पराभवातून सावरू पाहात होते, भारतभर पसरत चाललेल्या इंग्रजांच्या साम्राज्याला तोंड देण्याचा निकराचा प्रयत्न करत होते. राजकीय व सामाजिक अस्थिरता, अंतर्गत कलह, फाटाफुटीचे राजकारण यांमध्ये मराठी दरबारापुढे एक आव्हान येऊन ठेपले, ते हैदराबादच्या निजामाकडून! विविध राज्यांमधून विजय मिळवत आलेल्या अली व गुलाब या, दोन कसलेल्या, भीमकाय व बलदंड पैलवानांनी दुस-या बाजीराव पेशव्यांच्या भरदरबारात कुस्तीचे आव्हान दिले. पैलवानांचा आत्मविश्वास, त्यांची रग व तयारी बघून दरबारात पेशव्यांच्या पदरी असलेल्या बावन्न पैलवानांपैकी एकाचीही आव्हान स्वीकारण्याची हिंमत झाली नाही. पेशव्यांची इभ्रत पणाला लागल्याचे पाहून, पेशव्यांकडे भिक्षुकी करणा-या सतरा-अठरा वर्षांच्या बाळंभटदादा देवधर यांनी ते आव्हान स्वीकारले व तयारीसाठी काही मुदत मागून घेतली. त्यांनी त्यांच्या नाशिकजवळच्या कोठुरे गावी जाऊन मातेचे आशीर्वाद घेतले आणि नाशिक जिल्ह्यात असलेल्या, वणीच्या डोंगरावर वस
इमेज
  सामाजिक कार्यात मानवलोक अग्रेसर - विजय पवार दानशुरांच्या सहाय्यातून ९२ निराधारांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण अंबाजोगाई (प्रतिनिधी ) निराधार,वृद्ध आणि हाल अपेष्टात जीवन जगणाऱ्याना मानवलोक संस्थेचा भक्कम आधार असून सामाजिक कार्यात मानवलोक संस्था अग्रेसर असल्याचे मत कृषी अधिकारी विजय पवार यांनी व्यक्त केले ते निराधारांना जीवनावश्यक वस्तुचे वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कल्पना लोहिया, मित्रवंदा पन्हाळे,भागवत कांबळे,अरूण आसरडोहकर, विजय पवार,राहूल देशपांडे, अधिकार मर्लेचा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे पवार म्हणाले की, खऱ्या अर्थाने समाजात खुप दुःख दडलेले आहे हे मानवलोक परिवारात आल्यावर समजते मानव लोक संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून  सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दीन दुबळया घटकासाठी कार्यकर्त्यामध्ये सदैव तत्परता असते. अधिकार मर्लेचा म्हणाले की,मानवलोक संस्थेचे कार्य लोकाभिमुखअसून ही संस्था  वृध्द,अपंग,अंध, आजारग्रस्त, निराधारांसाठी संस्था कार्य करते अधिकार मर्लेचा, मित्रवृंदा पन्हाळे यांनीही जीवनातील संघर्षाची माहिती दिली  अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मानव
इमेज
  दुर्दैवी घटना: नीट परीक्षेतील अपयश:युवतीने गळफास घेऊन जीवन संपविले !   केज :- डॉक्टर होण्याची स्वप्न पहात वैद्यकीय पूर्व पात्रता परीकक्षेत (NEET) अपेक्षित गुण प्राप्त करता न आल्यामुळे नैराशेने खचून गेलेल्या केज तालुक्यातील एका १८ वर्षीय तरुणीने घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची हृदयद्रावक व काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मागील दोन वर्षा पासून कु दिपाली विश्वनाथ नाईकनवरे रा सबला ता केज ही १८ वर्ष वयाची तरूण विद्यार्थ्यांनी ही परिश्रम घेत होती. डॉक्टर होऊन सेवा करण्याचे तिचे स्वप्न होते.त्यासाठी ती कठोर मेहनत घेऊन वभ्यास करीत होती मात्र दि.१३ जून रोजी नीटचा निकाल लागला त्या निकालात अभ्यास आणि मेहनत करूनही नीट परीक्षेत कु. दिपाली नाईकनवरे अपेक्षित गुण न पडल्यामुळे तिची वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश मिळू शकणार नाही हे लक्षात येताच तिने दि. १७ जून रोजी प्रचंड आलेल्या नैराश्य आणि उदासीनता यामुळे तिने साबला येथील घरा त दुपारी २:०० च्या सुमारास गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. तिच्या पार्थिवावर साबला ता केज येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. विद्याताई देशपांडे- देशमुख यांची निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी)           तालुक्यातील एकमेव असलेल्या कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. विद्याताई देशपांडे - देशमुख यांची नुकतीच निवड समितीच्या माध्यमातून निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.               येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या दिवंगत प्राचार्या डॉ रेखा परळीकर यांचे निधन झाल्याने हि जागा रिक्त झाली होते. यानंतर गेली दोन वर्षे प्रभारी प्राचार्य म्हणून डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. शासनाच्या परवानगी नंतर प्राचार्यपदाची भरती करण्यात आली. या प्राचार्य पदाच्या भरती प्रकियेतील निवड समितीने प्राचार्य म्हणून डॉ विद्याताई देशपांडे- देशमुख यांची निवड केली. विद्याताई देशपांडे यांनी प्राचार्यपदाचा कार्यभार गुरुवारी (ता.१५) स्विकारला. प्राचार्यपदी विद्याताई देशपांडे यांची निवड झाल्याबदल संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक अनिलराव देशमुख, संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प

शासनकर्त्यांनी शेतकऱ्यांचे ससेहोलपट थांबवावी अन्यथा पुन्हा एल्गार ; काॅ.एड. अजय बुरांडे

इमेज
 ■ कोरड्या घोषणांचा सुकाळ; शेतकऱ्यांच्या माथी मात्र कायम दुष्काळ ● शासनकर्त्यांनी शेतकऱ्यांचे ससेहोलपट थांबवावी अन्यथा पुन्हा एल्गार ; काॅ.एड. अजय बुरांडे परळी / प्रतिनिधी मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतातुर झालेला असताना किसान सभेच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर राज्य सरकारने सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दीड हजार कोटी रुपयाच्या मदतीची घोषणा केली खरी; पण ही मदत केव्हा वितरित होणार हा प्रश्नच अनुत्तरितच आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीच्या मदतीसाठी केलेल्या संघर्षांती राज्य सरकारने मोठ्या अविर्भावात डांगोरा पीठून मदतीची घोषणा केली; पण या मदतीपासून निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी अजूनही वंचित आहेत. ही मदत कधी शेतकऱ्यांना मिळेल याचे ना शासन ना प्रशासन कुणीही उत्तरदायित्त्व घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यायला तयार नाही की साधं बोलायला तयार नाही. म्हणून या घोषणा 'बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी' होऊ नयेत म्हणून किसान सभा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांना छळणाऱ्या शेतमालाचे भाव पाडणाऱ्या लॉबीला पाठीशी घालून शेतकरी विरोधी धोरणे राबवणाऱ्या शास

एमपीलच्या आयोजनाबद्दल रोहित पवारांचे केले अभिनंदन

इमेज
  एमसीएच्या पुण्यातील स्टेडियमला खा.शरदचंद्र पवार यांचे नाव द्यावे - धनंजय मुंडेंची मागणी एमपीलच्या आयोजनाबद्दल रोहित पवारांचे केले अभिनंदन पुणे (दि. 16) - पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नाव देण्याची मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार यांच्याकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी रोहित दादा पवार यांना या संदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्रात आयपीएलच्या धर्तीवर एम पी एल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व आमदार रोहित दादा पवार यांचे अभिनंदनही केले आहे. एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे. या संघाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय त्याचबरोबर आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांचे क्री

परळीच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणारा भगीरथ हरवला

इमेज
  परळीच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणारा 'भगीरथ' हरवला: गौतमबापू  नागरगोजे यांचे निधन परळी ---         ग्रामीण भागात शिक्षणाची  गंगोत्री निर्माण करणारे , शिक्षण महर्षी गौतम बापू नागरगोजे यांचे वृद्धापकाळाने आज दि.16 जून रोजी निधन झाले.        मागील काही महिन्यांपासून ते  आजारी होते. आज शुक्रवारी सकाळी 7 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते 81 वर्षांचे होते .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी,त्यांना उत्तम शिक्षण मिळावे या हेतूने त्यांनी इंद्रायणी प्रतिष्ठान व सरस्वती प्रतिष्ठानची निर्मिती केली.मागील तीन दशकांपासून या प्रतिष्ठान मार्फत अनेक शाळा महाविद्यालय स्थापन करून गौतम बापू यांनी एकप्रकारे ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री खेचून आणली.धर्मापुरी,दैठणा घाट,लाडझरी,घाटनांदूर,डोंगर पिंपळा , मांडवा,आचार्य टाकळी,अशी खेडी पाडी,वाडी वस्त्यांवर शाळा उघडल्या.या ठिकाणच्या सर्व शाळा, महाविद्यालय मधून असंख्य विद्यार्थी शिक्षण घेवून आज विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवून अग्रेसर आहेत.         प्रशासनावर मजबूत पकड,सर्व विषयांचे प्रगल्भ ज्ञान असणारे गौतमबापू  यांनी ग
इमेज
  अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बसवलिंग पत्रवाळे यांचे नीट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल परचुंडी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बसवलींग पत्रवाळे याने नीट परीक्षेत 620 गुण घेऊन यश संपादन केले त्याबद्दल त्याचा परचुंडी गावकऱ्यांच्या वतीने गुरुवार दिनांक 15 जून रोजी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. अल्पभूधारक शेतकरी देवराव पत्रवाळे यांचे चिरंजीव बसवलिंग पत्रवाळे उर्फ बंडू याने नीट परीक्षेत 620 गुण घेऊन आपला डॉ होण्याचा मार्ग मोकळा केला,अत्यंत हालखीच्या परिस्थितीस लढा देत त्याने हे यश संपादन केले. आपल्या परचुंडी गावाचा भूमिपुत्र बंडू हा डॉ होणार याचा आनंद अख्या गावाने साजरा केला.        वडील देवराव पत्रवाळे, आई महानंदा पत्रवाळे व बसवलिंग पत्रवाळे यांचा हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी फेटा बांधून,शाल,श्रीफळ,पुष्पहार, पुष्पगुच्छ, पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला. कार्यक्रमास सुभाष पाटील, वसंतआप्पा नावंदे,आदर्श शिक्षक अशोक नावंदे,वैजाप्पा पत्रवाळे,अजय गडदे,गणेश गडदे,सुनील नावंदे,नितीन सरांडे, वश

एसटी वाहकाची आत्महत्या

इमेज
एसटी वाहकाची आत्महत्या केज :- केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथे धारूर एस टी आगारातील वाहकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबतची माहिती अशी की, गुरुवार दि. १५ जून रोजी धारूर एसटी आगारात वाहक असलेले महादेव ज्ञानोबा धस वय ३५ वर्ष रा. सारणी (सांगवी) यानी सारणी (सांगवी) शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजलेले नसून घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव यांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासमीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले. मयत वाहक महादेव धस यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विशेष पथके नेमावीत - मुंडेंचे कृषी मंत्र्यांना पत्र

इमेज
  बोगस बियाणे, चढ्या भावाने विक्री, खत-बियाण्यांची साठेबाजी रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा - धनंजय मुंडे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विशेष पथके नेमावीत - मुंडेंचे कृषी मंत्र्यांना पत्र 850 रुपयांची कापसाची बॅग 2000 हजाराला विकतात, मुंडेंनी मांडली वस्तुस्थिती मुंबई (दि.15) - खरीप हंगामाच्या तोंडावर मराठवाड्यात काही क्षेत्रात पाऊस झाला तर काही क्षेत्रांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे परंतु शेतकरी वर्गात सोयाबीन कपाशी यासह विविध बियाणे खरेदी करण्याबाबत लगबग सुरू आहे. याचाच फायदा घेऊन अनेक प्रकारचे बोगस बियाणे राज्यभरात बाजारात आणून प्रसिद्ध ब्रँडची नावे वापरून, चढ्या भावाने विक्री केली जात आहेत. शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक टाळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे कृषिमंत्र्यांकडे केली आहे.  धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. एक जून रोजीच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली एमआयडीसी परिसरात छत्रपती संभाजी नगर येथील एका नामांकि
इमेज
  MPL : धनंजय मुंडेंच्या छत्रपती संभाजी किंग्स संघात मराठवाड्यातील 12 खेळाडूंचा समावेश! पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुण्यात 15 जून पासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमिअर लीग (MPL) मध्ये मराठवाड्याची छत्रपती संभाजी किंग्स ही टीम सहभागी होत आहे. या टीम मध्ये मराठवाड्यातील तब्बल 12 खेळाडूंचा समावेश आहे.  आ. धनंजय मुंडे यांच्या वेंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स संघाने या स्पर्धेत भाग घेतला आहे. मराठवाड्यातल्या जास्तीत जास्त प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळावी या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी खेळाडूंच्या लिलावात सहभागी होऊन मराठवाड्यातील  जास्तीत जास्त खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न केले.  या संघाचा आयकॉन प्लेयर असलेला धाराशिवचा राजवर्धन हंगरकेर हा वेगवान गोलंदाज असून, तो नुकत्याच संपलेल्या आयपीएल मध्ये धोनीच्या सीएसके संघाकडून खेळला आहे. त्याचबरोबर इंडिया अंडर नाइंटिन संघात विश्वचशक देखील खेळलेला आहे.  याच संघात जालन्याचा वेगवान गोलंदाज रामेश्वर दौंड आणि ऑल राउंडर आकाश जाधव यांचाही समावेश
इमेज
  शासन आपल्या दारी हा उपक्रमात लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे वितरण जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे व आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते प्रमाणपत्र, विविध दाखले व लाभ वितरित  शासन आपल्या दारी हा उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे , आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते यावेळी लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. अंबाजोगाई, कैज, परळी या तालुक्यातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ तसेच प्रमाणपत्र व विविध दाखले यांचे वितरण करून संपन्न झाला. शासन आपल्या दारी हा उपक्रमांतर्गत तिन्ही तालुक्यातील निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण साठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .   याप्रसंगी आमदार नमिता मुंदडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार सर, अप्पर जिल्हाधिकारी (अंबाजोगाई) सुनील यादव, उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तिन्ही तालुक्यातील तहसीलदार गटविकास अधिकारी व विविध शासकीय अधिकारी आणि विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
इमेज
  माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांची श्रद्धानंद गुरुकुल आश्रमास सदिच्छा भेट व पाहणी  "सद्यस्थितीत आर्य समाजाच्या विचाराची राष्ट्राला गरज !" सेवेकरी पालक म्हणून गुरुकुलास  सर्वतोपरी सहकार्य करणार !           परळी वैजनाथ,दि.१४-                        सध्याच्या परिस्थितीत समाज व राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी  आर्य समाजाच्या विचारांची मोठ्या प्रमाणात  गरज असून परळी आर्य समाजाद्वारे चालविण्यात येणारे श्रद्धानंद गुरुकुल आश्रम हे आगामी काळात प्राचीन आदर्श मूल्यांच्या संवर्धनाचे प्रमुख केंद्र ठरेल. या संस्थेचा कायापालट करण्यासाठी एक सेवेकरी पालकाच्या रूपात सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असून येथील उपक्रम चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन माजी  मंत्री आमदार श्री धनंजय मुंडे यांनी दिले.                परळी शहरालगतच्या नंदागौळ मार्गावरील स्वामी श्रद्धांनंद गुरुकुल आश्रमास श्री मुंडे यांनी काल (दि.१४)सदिच्छा भेट दिली. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आ.श्री मुंडे बोलत होते. आश्रम संस्थेच्या वतीने सचिव श्री उग्रसेन राठौर व  वयोवृद्ध वानप्रस्थी श्री सोममुनि
इमेज
  नीट परिक्षेत ओंकार प्रभाकर गित्ते याचे 588 गुण घेऊन नेत्रदीपक यश परळी वैजनाथ/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील ओंकार प्रभाकर गित्ते याने कोणतेही क्लासेस न लावता  नीट परीक्षेत 588 गुण घेऊन नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. येथील ओंकार प्रभाकर गित्ते याने वैद्यकीय क्षेत्रासाठीची नीट ही परिक्षा दिली होती. त्याचा काल निकाल लागला असून ओंकार गित्ते याने या परिक्षेत 588 गुण घेवुन घवघवीत यश संपादीत केले आहे. ओंकार याचे इयत्ता पहिली ते दहावीचे शिक्षण परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूल येथे झाले असून अकरावी व बारावीचे शिक्षण टोकवाडी येथील रत्नेश्वर महाविद्यालय येथे झाले आहे. लहानपणापासूनच तो अत्यंत गुणी असून त्याने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये ही यश संपादन केलेले आहे.ओंकार यास लहानपणापासून परळी येथील आदर्श शिक्षक अरुण गीते यांचे मार्गदर्शन लाभले असे तो म्हणाला. त्याच्या या यशाबद्दल शाळा, महाविद्यालयाचे शिक्षक वृंद, यांच्यासह नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान या यशाबद्दल यशचे सर्व स्तरातून कौतूक ह
इमेज
  पोस्टाची महिला सन्मान बचतपत्र योजना ही महिलांचा सन्मान करणारी योजना...जिल्हाधिकारी ●श्रीमती दीपा मुधोळ-मुंढे जिल्हाधिकारी यांचाही योजनेत सहभाग बीड ,दि.13: -भारत सरकारच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने खास महिला व मुलीकरिता *महिला सन्मान बचत पत्र* ही योजना जाहीर केली व त्याची सुरवात दि 1 एप्रिल 2023 पासून देशभरातील सर्वच पोस्ट ऑफिसमधून प्रारंभ करण्यात आला. पोस्ट ऑफिसच्या इतर अल्पबचत योजनेपेक्षा अधिक व्याजदर असणारी ही योजना अल्पावधीतच देशभर लोकप्रिय ठरत असून, मोठ्या प्रमाणात महिला व मुलीचा सहभाग या योजनेत वाढत आहे.  डी आर शिवणीकर डाकघर अधिक्षक , प्रमोद गाढवे सहायक अधिक्षक, हेमंत पानखडे पोस्टमास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नवले जनसंपर्क अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या योजनेची सविस्तरपणे माहिती दिली. जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या स्वतःच्या नावे या योजनेत खाते उघडले. जिल्हाधिकारी बीड यांच्या या योजनेतील सहभागी होण्यामुळे निश्चितच या बाबीचा सकारात्मक प्रचार प्रसार होईल या योजनेत अधिकाधिक सहभाग वाढेल.     याप्रसंगी
इमेज
  Photo feature:संत गजानन महाराज दिंडी परळी-अंबाजोगाई रस्त्यावर टिपलेली मनमोहक दृष्ये टाळ-मृदुंगाच्या गजरेत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत आगमन *पालखीचे ५४ वे वर्ष ;तीन अश्व, ७०० वारकऱ्यांचा पालखीत समावेश* अंबाजोगाई / एमबी न्युज वृत्तसेवा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे टाळ-मृदुंगाच्या गजरेत आज दुपारी आगमन झाले आहे.त्यांच्या स्वागतासाठी अंबानगरी सज्ज होऊन रस्त्यावर रांगोळी काढली होती. २६ मेला आषाढी वारीसाठी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव येथुन प्रस्थान झाले आहे. दोन दिवसांच्या परळी येथील मुक्कामानंतर पालखीचे आज सकाळी अंबाजोगाई शहरात आगमन झाले. टाळ मृदंगाच्या तालावर शेकडो वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामांच्या गजरात ठेका धरला. पंढरीनाथ महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल, संत गजानन महाराज की जय, गण गण गणात बोते या जयघोषाने एकापाठोपाठ सुंदर अश्या चालीवर भजन करत या वारकऱ्यांनी अंबाजोगाई शहर अक्षरशः दणाणून सोडले. पूर्वी या पालखी सोहळ्यामध्ये हत्ती घोडे असा लवाजमा असायचा परंतु गेल्या काही वर्षापासून फक्त आश्
इमेज
  सायबर पोलीसांची ऑनलाईन चक्री /जुगारावर धडक कारवाई; मुद्देमालासह आरोपी अटक बीड....    सायबर पोलीस बीड यांनी दिनांक 13/06/2023 रोजी पाटोदा हद्दीत बस स्थानक समोर पत्र्याच शेड मध्ये चालू असलेल्या ऑनलाईन चक्रों जुगार अड्ड्यावर धाड टाकून धडक कारवाई केली. सदर कारवाईत ऑनलाईन चक्री जुगार खेळणारे व खेळविणारे असे एकुन नक आरोपींना ताब्यात घेण्यात आले, आरोपीतांच्या ताब्यातून दोन मोबाईल, दोन लॅपटॉप ईन्टरनेट मोडेम, तीन दुचाकी व रोख रक्कम असे सर्व मिळून एकून 2.81,430/- रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आले आहेत. पांअ 955 अजय जाधव नेमणुक सायबर पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरुन पाटोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पाटोदा पोलीस करत आहेत. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक बीड श्री नंदकुमार ठाकुर,अप्पर पोलीस अधीक्षक श्री पांडकर, बोड यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक आर.एस. सानप, पोउपनि श्री शैलेश जोगदंड, मपोउपनि टी. एम. खुळे, पोहा बप्पासाहेब दराडे, मोह आशिष बडमारे, पोना विजय घोडके, पोना अनिल डोंगरे, पोना/ 22 श्रीकांत बारगजे, पोअ प्रदिप बायभट, पोअ अमोल

620 गुण घेऊन डॉक्टर होण्याचा मार्ग सुकर केला

इमेज
  परचुंडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बंडू पत्रावळे याचे नीट परीक्षेत घवघवीत यश 620 गुण घेऊन डॉक्टर होण्याचा मार्ग सुकर केला परळी वैजनाथ/प्रतिनिधी  *जिद्द, चिकाटी, प्रयत्न त्याचबरोबर आहे त्या परिस्थितीत आढेवेढे न घेता शिक्षण घेण्याची आवड असेल तर अशा मुळातच टॅलेंट असलेल्या विद्यार्थाला नशीब कधीच हुलकावणी देत नाही. अशीच मनाशी खूणगाठ बांधून बालाघाटच्या दुष्काळी पट्ट्यात असलेल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाने नीट परीक्षेत 620 गुण घेऊन आपला वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा केला आहे.* परचुंडी ता.परळी वैजनाथ येथील सामान्य अल्पभूधारक होतकरू व प्रयोगशिल शेतकरी देवराव पत्रावळे व महानंदा पत्रावळे यांचा मुलगा बसवलिंग उर्फ बंडू याने माजलगाव येथील आपले आजी आजोबा सीताबाई व रामाप्पा शेटे यांचे कडे राहून सिध्देश्वर विद्यालयात प्राथमिक व दहावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण घेतले परिस्थिती सामान्य असतानाही अकरावी लातूर येथे तर बारावी पुणे येथे चिकाटीने पूर्ण केली. आई वडील व आजीचे कष्टाळू जीवन जवळून बघितलेल्या बंडूने घरची परिस्थिती बदलण्यासाठी डॉक्टर व्हायचे स्वप्न उरी बाळ

सौ.दुर्गाताई कुलकर्णी यांचे निधन

इमेज
  सौ.दुर्गाताई कुलकर्णी यांचे निधन बीड/प्रतिनिधी  येथील जालनारोड वरील सहयोगनगर भागातील ज्येष्ठ नागरिक सौ.दुर्गाताई मधुकरराव कुलकर्णी रायमोहकर यांचे वयाच्या 81 व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले.  येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले। बीड शहरातील विविध स्तरातील लोक यावेळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती मधुकरराव; मुले संतोष आणि डाॅ आनंद; तीन विवाहित मुली ; लेकी सूना असा परिवार आहे .बीडचे लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत्या.
इमेज
  संशयकल्लोळ :परळी शहर पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीचा मृत्यू : नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप; शहरात मोठा बंदोबस्त परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...             परळी शहरात सध्या मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ठीक ठिकाणी पोलीसच पोलीस दिसत आहेत. यामुळे नागरिकात मोठ्या प्रमाणावर हा बंदोबस्त कशाचा याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान परळी शहर पोलिसांच्या ताब्यातील चोरी प्रकरणातील एका आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परंतु हा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे मयताच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. काल रात्रीपासूनच मोठा जमाव उपजिल्हा रुग्णालयात जमा झाल्याने पोलीस प्रशासनाने बंदोबस्तात वाढ केली आहे.          परळी शहर पोलिसांनी चौकशीसाठी बोलविलेल्या एका संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. झरीन खान ( 48,  रा मलीकपुरा, परळी) असे मृताचे नाव आहे. त्यांचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याचे त्यांच्या मुलाने म्हटले आहे. दरम्यान मयत झरीन खान यांच्या मृतदेहाची उत्तरिय तपासणी (पोस्ट मार्टम )इन कॅमेरा होणार आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले क