इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 सामाजिक कार्यात मानवलोक अग्रेसर - विजय पवार


दानशुरांच्या सहाय्यातून ९२ निराधारांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण


अंबाजोगाई (प्रतिनिधी )


निराधार,वृद्ध आणि हाल अपेष्टात जीवन जगणाऱ्याना मानवलोक संस्थेचा भक्कम आधार असून सामाजिक कार्यात मानवलोक संस्था अग्रेसर असल्याचे मत कृषी अधिकारी विजय पवार यांनी व्यक्त केले

ते निराधारांना जीवनावश्यक वस्तुचे वितरण कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी कल्पना लोहिया, मित्रवंदा पन्हाळे,भागवत कांबळे,अरूण आसरडोहकर, विजय पवार,राहूल देशपांडे, अधिकार मर्लेचा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे पवार म्हणाले की, खऱ्या अर्थाने समाजात खुप दुःख दडलेले आहे हे मानवलोक परिवारात आल्यावर समजते मानव लोक संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून 

सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दीन दुबळया घटकासाठी कार्यकर्त्यामध्ये सदैव तत्परता असते. अधिकार मर्लेचा म्हणाले की,मानवलोक संस्थेचे कार्य लोकाभिमुखअसून ही संस्था  वृध्द,अपंग,अंध, आजारग्रस्त, निराधारांसाठी संस्था कार्य करते अधिकार मर्लेचा, मित्रवृंदा पन्हाळे यांनीही जीवनातील संघर्षाची माहिती दिली  अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मानवलोक परिवारांतर्फे पन्हाळे यांचा गौरव करण्यात आला.प्रारंभी संजना आपेट,सावित्री सागरे यांनी स्वागत गीत गायिले प्रास्तविकातून कल्पना लोहिया यांनी मानवलोकच्या कार्याची माहिती दिली शाम सरवदे यांनी संचालन करून आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप मारवाळ,बाळू फुलझळके यांच्यासह इतरांनी परीश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!