युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 संशयकल्लोळ :परळी शहर पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीचा मृत्यू : नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप; शहरात मोठा बंदोबस्त


परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...
            परळी शहरात सध्या मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ठीक ठिकाणी पोलीसच पोलीस दिसत आहेत. यामुळे नागरिकात मोठ्या प्रमाणावर हा बंदोबस्त कशाचा याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान परळी शहर पोलिसांच्या ताब्यातील चोरी प्रकरणातील एका आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परंतु हा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे मयताच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. काल रात्रीपासूनच मोठा जमाव उपजिल्हा रुग्णालयात जमा झाल्याने पोलीस प्रशासनाने बंदोबस्तात वाढ केली आहे.
         परळी शहर पोलिसांनी चौकशीसाठी बोलविलेल्या एका संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. झरीन खान ( 48,  रा मलीकपुरा, परळी) असे मृताचे नाव आहे. त्यांचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याचे त्यांच्या मुलाने म्हटले आहे. दरम्यान मयत झरीन खान यांच्या मृतदेहाची उत्तरिय तपासणी (पोस्ट मार्टम )इन कॅमेरा होणार आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, परळीत 6 जून रोजी मुनिमाच्या हातातील 4 लाख 90 हजार रुपय रोकड असलेली बॅग चोरीस गेली होती. याप्रकरणी २ संशयित आरोपींना 13 जून रोजी रात्री परळी शहर पोलिसांच्या एका पथकाने ताब्यात घेतले. मात्र, अचानक प्रकृती बिघडल्याने झरीन खान यांना उपजिल्हा रुग्णालयमध्ये पोलिसांनी दाखल केले होते. तेथे तपासून डॉक्टरांनी खान यांना मृत घोषित केले. तर याच प्रकरणात मलीकपुरा भागातीलच एकजण अटकेत आहे. खान यांचे आझाद चौकात गॅरेज आहे. झरीन खान यांच्या मृत्यूची घटना समजल्यानंतर पोलीस ठाण्याजवळ गर्दी जमली होती. अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व स्थानिक पोलिसांनी गर्दीला नियंत्रित केले. पोलिसांनी गर्दीला सहकार्याचे आवाहन केले. सध्या शहरात पोलीस  बंदोबस्त वाढविण्यात आला असून शांतता आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या