एमपीलच्या आयोजनाबद्दल रोहित पवारांचे केले अभिनंदन

 एमसीएच्या पुण्यातील स्टेडियमला खा.शरदचंद्र पवार यांचे नाव द्यावे - धनंजय मुंडेंची मागणी




एमपीलच्या आयोजनाबद्दल रोहित पवारांचे केले अभिनंदन


पुणे (दि. 16) - पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नाव देण्याची मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार यांच्याकडे केली आहे.


धनंजय मुंडे यांनी रोहित दादा पवार यांना या संदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्रात आयपीएलच्या धर्तीवर एम पी एल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व आमदार रोहित दादा पवार यांचे अभिनंदनही केले आहे.


एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे. या संघाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे.


मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय त्याचबरोबर आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांचे क्रीडा विश्वात व विशेष करून क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे.


भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या निवृत्त क्रिकेटर्सला पेन्शन सुरू करणे यासारखे मोठे निर्णय पवार साहेबांच्या कारकिर्दीत होऊ शकले, याचाही उल्लेख धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात केला आहे. 


गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले, त्याच धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएनच्या मालकीच्या पुणे येथील गहुंजे स्टेडियमला खा. शरदचंद्र पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी आ.रोहित पवार यांच्याकडे केली आहे.


मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स या आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी धनंजय मुंडे हे स्वतः मैदानात पूर्णवेळ उपस्थित राहत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !