प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे - भाजपा महिला मोर्चाचं आवाहन

 खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत उद्या परळीत योग शिबिर




महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे - भाजपा महिला मोर्चाचं आवाहन


परळी । दि. २० ।

भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मोदी@9 महाजनसंपर्क अभियान या उपक्रमाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परळी शहरात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप नेत्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या शिबीरात महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहर भाजपा महिला मोर्चाने केले आहे. 


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने सत्तेची नऊ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त भारतीय जनता पक्ष महाजनसंपर्क अभियान राबवित आहे, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने भाजपने या उपक्रमाअंतर्गत उद्या २१ जून रोजी   शहरातील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सकाळी ६ वा. खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन होणार आहे. मनाची एकाग्रता आणि शारीरिक आरोग्य सदृढ करणाऱ्या अनेक योग पद्धतींचा अभ्यास आणि  दैनंदिन जीवनात अनुकरण करण्यासाठी अधिकाधिक महिलांनी शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन डाॅ. शालिनी कराड, जयश्री मुंडे, नगरसेविका उमाताई समशेट्टे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सुचिता पोखरकर यांनी केले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या