प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 जागृती नागरि सहकारी पतसंस्थेस जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची  सदिच्छा भेट




परळी (प्रतिनिधी)...

 

     बीड जिल्ह्याच्या सहकार तथा आर्थिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या परळी वैजनाथ येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या परळी शहरातील मुख्य कार्यालयास आज बीड जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक समृत जाधव तसेच परळी येथील सहाय्यक निबंधक व्ही. एस. जगदाळे यांनी संयुक्तरित्या सदिच्छा भेट दिली.


    याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्हाच नव्हे तर सबंध मराठवाड्यात आर्थिक तथा सहकार क्षेत्रामध्ये नावलौकिक असणाऱ्या परळी येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या अरुणोदय मार्केट स्थित मुख्य कार्यालयास आज दिनांक 19 जून 2023 रोजी बीड जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे जिल्हा उपनिबंधक समृत जाधव तसेच परळी उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक उपनिबंधक व्ही. एस. जगदाळे यांनी संयुक्तरित्या सदिच्छा भेट दिली. या सदिच्छा भेटीदरम्यान जागृती ग्रुपचे मुख्य मार्गदर्शक तथा सहकार रत्न प्रा. गंगाधर शेळके सर यांनी जिल्हा उपनिबंधक श्री. समृत जाधव यांचा शाल, श्रीफळ पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन आदर सत्कार केला. यावेळी परळी कार्यालयाचे सहाय्यक निबंधक व्ही. एस. जगदाळे यांचा शाल,पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन श्री. राहुल शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जागृती ग्रुप चे मुख्य मार्गदर्शक प्रा. शेळके सर यांनी संस्थेच्या विविध विस्तारित शाखा तसेच कार्यालयीन कामकाज व आर्थिक प्रगती विषयी माहिती दिली. याप्रसंगी जागृती नागरी सहकारी पतसंस्थेचा पारदर्शक कारभार तथा आर्थिक प्रगती आदींबाबत जिल्हा उपनिबंधक श्री समृत जाधव यांनी समाधान व्यक्त करत काही मार्गदर्शक सूचना देखील केल्या.

   

     याप्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ तसेच कर्मचारी सर्वश्री बालाजी रामगीरवार, दत्ता चव्हाण, सुधाकर शिंदे, मनोज मानधने, अश्वमेघ गिरी, प्रसाद सोळंके, सुनील कोचे, वैभव देशमुख, राजेश मगर, सोमेश्वर साबळे, सुनील चोभारकर इत्यादींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन जागृती पतसंस्थेचे प्रशासकीय अधिकारी हेमंत कुलकर्णी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या