प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर व जिल्हा समन्वयक युवासेना प्रा.अतुल दुबे यांचा उपक्रम

 शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वारकऱ्यांना मेडिकल किट व अत्यावश्यक वस्तूंचे वितरण


उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर व जिल्हा समन्वयक युवासेना प्रा.अतुल दुबे यांचा उपक्रम


परळी (प्रतिनिधी)

पंढरपूर कडे आषाढी वारीनिमित्त जाणाऱ्या वारकऱ्यांना परळी वैजनाथ येथे आल्यानंतर मेडिकल किट व दैनंदिन अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.19 जुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त हा विशेष उपक्रम उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर व युवासेना जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे यांच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी परळी शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिंडीचे प्रमुख संदीप शास्त्री महाराज यांचाही शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.


19 जुन रोजी शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वारकऱ्यांना आरोग्य किट आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. संत जगमित्र मंदिर येथे हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी बोलत असताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की, वारकरी पंढरपूरच्या दिशेने शेकडो किलोमीटर पायी जात असतात. पांडुरंगाच्या भक्तीची ओढ त्यांना तहान - भूक विसरायला लावते. अशातच तो खडतर प्रवास पूर्ण करतांना त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात. त्यांच्याकडे साहजिकच दैनंदिन आवश्यक असलेली औषधी उपलब्ध नसते. ही बाब लक्षात घेऊनच किरकोळ आवश्यक असणारी औषधी, गोळ्या, साबण, डोक्याचे तेल, झेंडू बाम इत्यादी वस्तूंचा समावेश असलेले किट वारकऱ्यांना भेट देण्यात आल्याचे अभयकुमार ठक्कर म्हणाले. या उपक्रमाच्या आयोजन प्रसंगी युवा सेना विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, माजी शहर संघटक संजय कुकडे, उपशहर प्रमुख किशन बुंदेले, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख, संजय सोमाने, शिवाजी नगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी, मनिष जोशी, प्रकाश देवकर, नवनाथ वरवटकर, योगेश जाधव, सूरज देवकर, योगेश घेवारे, अशोक चव्हाण, लक्ष्मण मुंडे, सागर चव्हाण, रघुनाथ बोले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या