MPL : धनंजय मुंडेंच्या छत्रपती संभाजी किंग्स संघात मराठवाड्यातील 12 खेळाडूंचा समावेश!




पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुण्यात 15 जून पासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमिअर लीग (MPL) मध्ये मराठवाड्याची छत्रपती संभाजी किंग्स ही टीम सहभागी होत आहे. या टीम मध्ये मराठवाड्यातील तब्बल 12 खेळाडूंचा समावेश आहे. 


आ. धनंजय मुंडे यांच्या वेंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स संघाने या स्पर्धेत भाग घेतला आहे. मराठवाड्यातल्या जास्तीत जास्त प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळावी या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी खेळाडूंच्या लिलावात सहभागी होऊन मराठवाड्यातील  जास्तीत जास्त खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न केले. 


या संघाचा आयकॉन प्लेयर असलेला धाराशिवचा राजवर्धन हंगरकेर हा वेगवान गोलंदाज असून, तो नुकत्याच संपलेल्या आयपीएल मध्ये धोनीच्या सीएसके संघाकडून खेळला आहे. त्याचबरोबर इंडिया अंडर नाइंटिन संघात विश्वचशक देखील खेळलेला आहे. 


याच संघात जालन्याचा वेगवान गोलंदाज रामेश्वर दौंड आणि ऑल राउंडर आकाश जाधव यांचाही समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातील डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहसीन सय्यद, संभाजी नगरचा डावखुरा स्पिनर ऋषीकेश नायर, नांदेड चा लेग स्पिनर स्वराज चव्हाण, रणजीपटू सामसुजा काझी, संभाजी नगरचा ट्वेन्टी ट्वेन्टी स्पेशालिस्ट आनंद ठेंगे, उजव्या हाताचा फलंदान स्वप्नील चव्हाण, बीडचा विकेट किपर बॅट्समन सौरभ नवले, धाराशिवचा मिडल ऑर्डर बॅट्समन अभिषेक पवार, ऋषीकेश दौंड या मराठवाड्यातल्या खेळाडूंचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार