पोस्टाची महिला सन्मान बचतपत्र योजना ही महिलांचा सन्मान करणारी योजना...जिल्हाधिकारी


●श्रीमती दीपा मुधोळ-मुंढे जिल्हाधिकारी यांचाही योजनेत सहभाग


बीड ,दि.13: -भारत सरकारच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने खास महिला व मुलीकरिता *महिला सन्मान बचत पत्र* ही योजना जाहीर केली व त्याची सुरवात दि 1 एप्रिल 2023 पासून देशभरातील सर्वच पोस्ट ऑफिसमधून प्रारंभ करण्यात आला.

पोस्ट ऑफिसच्या इतर अल्पबचत योजनेपेक्षा अधिक व्याजदर असणारी ही योजना अल्पावधीतच देशभर लोकप्रिय ठरत असून, मोठ्या प्रमाणात महिला व मुलीचा सहभाग या योजनेत वाढत आहे.


 डी आर शिवणीकर डाकघर अधिक्षक , प्रमोद गाढवे सहायक अधिक्षक, हेमंत पानखडे पोस्टमास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नवले जनसंपर्क अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या योजनेची सविस्तरपणे माहिती दिली.


जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या स्वतःच्या नावे या योजनेत खाते उघडले. जिल्हाधिकारी बीड यांच्या या योजनेतील सहभागी होण्यामुळे निश्चितच या बाबीचा सकारात्मक प्रचार प्रसार होईल या योजनेत अधिकाधिक सहभाग वाढेल.

    याप्रसंगी डाकघर अधिक्षक श्री. शिवणीकर यांच्या हस्ते श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे यांना सन्मानपूर्वक बचतपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

     

*योजनेची वैशिष्ट्ये* 

●योजना महिला व मुलीकरिता

●बचत पत्राची मुदत 2 वर्ष

●योजनेस व्याज दर 7.5% प्रतिवर्षी राहील.व्याज चक्रवाढ पद्धतीने असेल.

●एका महिलेच्या नावावर किंवा मुलीच्या वतीने तिच्या नावावर तिचे पालक या योजनेचे बचत पत्र घेऊ शकतात.

●किमान गुंतवणूक 1000/- व कमाल गुंतवणूक रु दोन लाख पर्यंत कितीही बचत पत्र घेता येईल.पण दोन खात्यामध्ये किमान तीन महिन्याचे अंतर असले पाहिजे.

● एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील 40% ,रक्कम एकदाच काढता येईल.

●अपवादात्मक परिस्थितीशिवाय खाते मुदतपूर्व बंद करता येणार नाही.


अधिक माहितीसाठी संपर्क शिवाजी नवले, जनसंपर्क अधिकारी, 

डाकघर बीड 9960027010

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !