परळीच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणारा भगीरथ हरवला

 परळीच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणारा 'भगीरथ' हरवला: गौतमबापू  नागरगोजे यांचे निधन



परळी ---

        ग्रामीण भागात शिक्षणाची  गंगोत्री निर्माण करणारे , शिक्षण महर्षी गौतम बापू नागरगोजे यांचे वृद्धापकाळाने आज दि.16 जून रोजी निधन झाले.

       मागील काही महिन्यांपासून ते  आजारी होते. आज शुक्रवारी सकाळी 7 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते 81 वर्षांचे होते .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी,त्यांना उत्तम शिक्षण मिळावे या हेतूने त्यांनी इंद्रायणी प्रतिष्ठान व सरस्वती प्रतिष्ठानची निर्मिती केली.मागील तीन दशकांपासून या प्रतिष्ठान मार्फत अनेक शाळा महाविद्यालय स्थापन करून गौतम बापू यांनी एकप्रकारे ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री खेचून आणली.धर्मापुरी,दैठणा घाट,लाडझरी,घाटनांदूर,डोंगर पिंपळा , मांडवा,आचार्य टाकळी,अशी खेडी पाडी,वाडी वस्त्यांवर शाळा उघडल्या.या ठिकाणच्या सर्व शाळा, महाविद्यालय मधून असंख्य विद्यार्थी शिक्षण घेवून आज विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवून अग्रेसर आहेत. 

       प्रशासनावर मजबूत पकड,सर्व विषयांचे प्रगल्भ ज्ञान असणारे गौतमबापू  यांनी ग्रामीण भागातीलच उच्चशिक्षित   तरुणाना आपल्या संस्थांमध्ये प्राधान्य दिले. या शिक्षक, प्राध्यापक यांच्या माध्यमातून अखंडपणे या सर्व संस्था शाळांमधून उत्कृष्ट अध्यापनाचे कार्य बापूंनी घडवून आणले.

      त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे . त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वत्र शोककळा पसरली. नागदरा या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले .

ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणारा भगीरथ

शिक्षण क्षेत्रात ज्या काळात मक्तेदारी होती.गोरगरिबांना शिक्षणाच्या संधीची दारे बंद होती. अशा विपरीत परिस्थितीत ग्रामीण भागात शैक्षणिक गंगा पोचविण्याचे आणि असंख्य शैक्षणिक बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचे काम गौतम बापू नागरगोजे यांनी केले.ज्यांचा कोणी त्राता नाही,वाली नाही अशांना उभं करुन हजारोंना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र कष्ट करून,ज्ञानगंगा दारात आणण्याचं भगीरथ कार्य त्यांनी केले. इंद्रायणी व सरस्वती प्रतिष्ठान परळी वैजनाथचे संस्थापक अध्यक्ष असलेले गौतमराव बापू नागरगोजे यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक संस्थांचे जाळे विणले. बीड जिल्ह्यातील ते सर्व परिचित व्यक्तिमत्व होते.भाजपाचे जेष्ठ नेते म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले.दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे निकटवर्तीय विश्वासु सहकारी म्हणून काम केले. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोकसंवेदना व्यक्त होत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार