सायबर पोलीसांची ऑनलाईन चक्री /जुगारावर धडक कारवाई; मुद्देमालासह आरोपी अटक

बीड....    सायबर पोलीस बीड यांनी दिनांक 13/06/2023 रोजी पाटोदा हद्दीत बस स्थानक समोर पत्र्याच शेड मध्ये चालू असलेल्या ऑनलाईन चक्रों जुगार अड्ड्यावर धाड टाकून धडक कारवाई केली. सदर कारवाईत ऑनलाईन चक्री जुगार खेळणारे व खेळविणारे असे एकुन नक आरोपींना ताब्यात घेण्यात आले, आरोपीतांच्या ताब्यातून दोन मोबाईल, दोन लॅपटॉप ईन्टरनेट मोडेम, तीन दुचाकी व रोख रक्कम असे सर्व मिळून एकून 2.81,430/- रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आले आहेत. पांअ 955 अजय जाधव नेमणुक सायबर पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरुन पाटोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पाटोदा पोलीस करत आहेत.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक बीड श्री नंदकुमार ठाकुर,अप्पर पोलीस अधीक्षक श्री पांडकर, बोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक आर.एस. सानप, पोउपनि श्री शैलेश जोगदंड, मपोउपनि टी. एम. खुळे, पोहा बप्पासाहेब दराडे, मोह आशिष बडमारे, पोना विजय घोडके, पोना अनिल डोंगरे, पोना/ 22 श्रीकांत बारगजे, पोअ प्रदिप बायभट, पोअ अमोल दरेकर, पोअ अजय जाधव वसंपूर्ण युनिट सायबर पोलीस स्टेशन बीड यांनी केली आहे. सर्व नागरीकांनी ऑनलाईन पध्दतीने आर्थिक व्यवहार करताना आलेले फोन, SMS ची खात्री करुनच व्यवहार करावा असे सायबर पोलीस स्टेशन, बीड तर्फे आवाहान करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार