माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांची श्रद्धानंद गुरुकुल आश्रमास सदिच्छा भेट व पाहणी

 "सद्यस्थितीत आर्य समाजाच्या विचाराची राष्ट्राला गरज !"

सेवेकरी पालक म्हणून गुरुकुलास  सर्वतोपरी सहकार्य करणार !

          परळी वैजनाथ,दि.१४- 

                      सध्याच्या परिस्थितीत समाज व राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी  आर्य समाजाच्या विचारांची मोठ्या प्रमाणात  गरज असून परळी आर्य समाजाद्वारे चालविण्यात येणारे श्रद्धानंद गुरुकुल आश्रम हे आगामी काळात प्राचीन आदर्श मूल्यांच्या संवर्धनाचे प्रमुख केंद्र ठरेल. या संस्थेचा कायापालट करण्यासाठी एक सेवेकरी पालकाच्या रूपात सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असून येथील उपक्रम चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन माजी  मंत्री आमदार श्री धनंजय मुंडे यांनी दिले.

               परळी शहरालगतच्या नंदागौळ मार्गावरील स्वामी श्रद्धांनंद गुरुकुल आश्रमास श्री मुंडे यांनी काल (दि.१४)सदिच्छा भेट दिली.

यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आ.श्री मुंडे बोलत होते. आश्रम संस्थेच्या वतीने सचिव श्री उग्रसेन राठौर व  वयोवृद्ध वानप्रस्थी श्री सोममुनिजी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना आमदार श्री मुंडे यांनी आर्य समाज परळीच्या ७५ वर्षांच्या कार्यांचा  गौरव करून गेल्या २७ वर्षांपासून चालवण्यात येणाऱ्या या गुरुकुल आश्रमाच्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले-  सध्याच्या मानवनिर्मित जाती-पंथाच्या व्यवस्थेत माणसाला माणूस म्हणून जगण्याची ऊर्जा प्रदान करणारे "आर्य समाज" हे एक मोलाचे विचारपीठ आहे. जुन्या पिढीतील आर्य समाजी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करीत या संस्थेचा काळापालट केला व पुढील पिढी हे कार्य उत्साहाने करीत आहे, हे पाहून मनस्वी आनंद होतो. या महत्कार्यात एक लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्याकडून या गुरुकुल आश्रमातील सर्व सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  अथक प्रयत्न केले जातील व आगामी काही वर्षात या पवित्र स्थळाला राज्यातील वेद,संस्कृत विद्येचे ज्ञानक्षेत्र तर अद्ययावत संसाधनांनी परिपूर्ण असे निसर्गोपचार केंद्र बनवले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

    यावेळी गुरुकुलाचे आचार्य श्री सत्येंद्र शास्त्री यांचा निसर्गोपचारविद्येत पारंगत व तज्ज्ञ चिकित्सक झाल्याबद्दल आ.श्री मुंडे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आर्य समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्याची निवेदन सादर केले. तेव्हा श्री मुंडे यांनी लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना सुयोग्य प्रकारे कामाचे नियोजन करून कार्य पूर्णत्वास नेण्याच्या  सूचना दिल्या. यावेळी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सूर्यभान मुंडे यांचाही सत्कार करण्यात आला . त्यानंतर आ.श्री मुंडे यांनी गुरुकुलातील सर्व उपक्रमांची पाहणी केली.                         ‌.                प्रारंभी गुरुकुल परिसरात त्यांचे आगमन होताच बालब्रह्मचार्यांनी  वेदमंत्राच्या उद्घोषात फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. यावेळी आर्य समाजाचे सचिव श्री उग्रसेन राठौर, उपाध्यक्ष लक्ष्मणराव आर्य, डॉ. मधुसूदन काळे ,सहसचिव जयपाल लाहोटी,पं. प्रशांतकुमार शास्त्री, कोषाध्यक्ष देविदासराव कावरे , पुस्तकाध्यक्ष अरुण चव्हाण, सदस्य गोवर्धन चाटे, रंगनाथ तिवार, डॉ. विश्वास भायेकर,  डॉ.वीरेंद्र शास्त्री, सुरेंद्र कावरे, धीरज भंडारी, मुकेश कलंत्री, शैलेश दोडिया, राजेश दाड ,शरद कावरे , प्रा .जगदीश कावरे, उदय तिवार , यज्ञप्रकाश हुलगुंडे, वैजनाथ मुंडे,उमेश तिवार व गुरुकुलातील सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री लक्ष्मण आर्य गुरुजी यांनी केले, तर सूत्रसंचालन  प्रा.डा. नयनकुमार आचार्य यांनी केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !