इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 'वैद्यनाथ' कारखान्याच्या अध्यक्षपदी  पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड; व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत कराड


अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व नव नियुक्त संचालक गोपीनाथ गडावर नतमस्तक


परळी वैजनाथ ।दिनांक १९।

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजाताई मुंडे यांची आज सर्वानुमते बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमन म्हणून चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली. 


   वैद्यनाथ साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली, यात सर्वच्या सर्व संचालक बिनविरोध निवडून आले होते. आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी जिल्हा उप निबंधक जाधव यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात पंकजाताई मुंडे यांची पुन्हा चेअरमन पदी सर्वानुमते निवड झाली. व्हाईस चेअरमन म्हणून चंद्रकांत कराड यांची निवड झाली.


    या बैठकीस संचालक सर्वश्री सतीश मुंडे, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, अजय मुंडे, वाल्मिक कराड, रेशीम नाना कावळे, ज्ञानोबा भगवान मुंडे,  राजेश गिते, पांडूरंग फड,हरिभाऊ गुट्टे,सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड, शिवाजीराव मोरे, सुधाकर सिनगारे, सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे, केशव माळी आदी उपस्थित होते.


पंकजाताई मुंडेंसह नव नियुक्त संचालकांनी घेतले गोपीनाथ गडाचे दर्शन

------------

पंकजाताई मुंडे यांची चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल या बैठकीत खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी सर्व विजयी संचालकांचेही पुष्पहार घालून स्वागत व अभिनंदन करण्यात आले. बैठकीनंतर पंकजाताई मुंडे, चंद्रकांत कराड यांचेसह सर्व संचालकांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!