Photo feature:संत गजानन महाराज दिंडी परळी-अंबाजोगाई रस्त्यावर टिपलेली मनमोहक दृष्ये








टाळ-मृदुंगाच्या गजरेत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत आगमन

*पालखीचे ५४ वे वर्ष ;तीन अश्व, ७०० वारकऱ्यांचा पालखीत समावेश*


अंबाजोगाई / एमबी न्युज वृत्तसेवा

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे टाळ-मृदुंगाच्या गजरेत आज दुपारी आगमन झाले आहे.त्यांच्या स्वागतासाठी अंबानगरी सज्ज होऊन रस्त्यावर रांगोळी काढली होती.


२६ मेला आषाढी वारीसाठी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव येथुन प्रस्थान झाले आहे. दोन दिवसांच्या परळी येथील मुक्कामानंतर पालखीचे आज सकाळी अंबाजोगाई शहरात आगमन झाले. टाळ मृदंगाच्या तालावर शेकडो वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामांच्या गजरात ठेका धरला. पंढरीनाथ महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल, संत गजानन महाराज की जय, गण गण गणात बोते या जयघोषाने एकापाठोपाठ सुंदर अश्या चालीवर भजन करत या वारकऱ्यांनी अंबाजोगाई शहर अक्षरशः दणाणून सोडले.

पूर्वी या पालखी सोहळ्यामध्ये हत्ती घोडे असा लवाजमा असायचा परंतु गेल्या काही वर्षापासून फक्त आश्वच या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे. प्रस्थानाच्या मार्गावर विविध गावांमध्ये शहरांमध्ये संत गजानन महाराज पालखीचे उत्स्फूर्तपणे स्वागत आणि पूजा केली जाते.

पालखीचे हे  ५४  वे वर्ष असून पालखीत शेगाव येथून तीन अश्व ,७०० वारकरी सहभागी आहेत. यात काही टाळकरी तर काहींच्या हातात भगवा पताका आहे. संत गजानन महाराज पालखी सोहळा हा अत्यंत शिस्तबद्ध म्हणून ओळखला जातो.

श्री संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असून रात्री भजन कीर्तन कार्यक्रम होणार आहेत तर सकाळी ८.०० वाजता पालखी पंढरपूरसाठी अंबाजोगाई शहरातून प्रस्थान होईल. 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार