लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. विद्याताई देशपांडे- देशमुख यांची निवड





परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

          तालुक्यातील एकमेव असलेल्या कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. विद्याताई देशपांडे - देशमुख यांची नुकतीच निवड समितीच्या माध्यमातून निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

              येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या दिवंगत प्राचार्या डॉ रेखा परळीकर यांचे निधन झाल्याने हि जागा रिक्त झाली होते. यानंतर गेली दोन वर्षे प्रभारी प्राचार्य म्हणून डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. शासनाच्या परवानगी नंतर प्राचार्यपदाची भरती करण्यात आली. या प्राचार्य पदाच्या भरती प्रकियेतील निवड समितीने प्राचार्य म्हणून डॉ विद्याताई देशपांडे- देशमुख यांची निवड केली. विद्याताई देशपांडे यांनी प्राचार्यपदाचा कार्यभार गुरुवारी (ता.१५) स्विकारला. प्राचार्यपदी विद्याताई देशपांडे यांची निवड झाल्याबदल संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक अनिलराव देशमुख, संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख यांच्यासह सर्व संचालक व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. प्राचार्या विद्याताई देशपांडे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्यामरावजी देशमुख यांच्या स्नुषा तर संस्थेचे सचिव रविंद्र देशमुख यांच्या पत्नी आहेत.  यानिवडीबदल बोलताना प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांनी सांगितले की, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्यामरावजी देशमुख यांच्या विचारावर व महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी व विद्यार्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !