श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट सचिवपदी प्रा. बाबासाहेब देशमुख




परळी : श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या सचिवपदी प्रा. बाबासाहेब वामनराव देशमुख यांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांनी १७ जून रोजी सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. ट्रस्ट विश्वस्तांच्या बैठकीत देशमुख यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीस श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. २००८ ते ११ या तीन वर्षांच्या कालावधीतही देशमुख सचिव होते. त्यांच्याकडे दुसऱ्यांदा ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राजेश देशमुख यांची सचिवपदाची तीन वर्षाची मुदत संपल्याने त्यांच्या जागी बाबासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार