नीट परिक्षेत ओंकार प्रभाकर गित्ते याचे 588 गुण घेऊन नेत्रदीपक यश



परळी वैजनाथ/प्रतिनिधी

परळी वैजनाथ येथील ओंकार प्रभाकर गित्ते याने कोणतेही क्लासेस न लावता  नीट परीक्षेत 588 गुण घेऊन नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

येथील ओंकार प्रभाकर गित्ते याने वैद्यकीय क्षेत्रासाठीची नीट ही परिक्षा दिली होती. त्याचा काल निकाल लागला असून ओंकार गित्ते याने या परिक्षेत 588 गुण घेवुन घवघवीत यश संपादीत केले आहे. ओंकार याचे इयत्ता पहिली ते दहावीचे शिक्षण परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूल येथे झाले असून अकरावी व बारावीचे शिक्षण टोकवाडी येथील रत्नेश्वर महाविद्यालय येथे झाले आहे. लहानपणापासूनच तो अत्यंत गुणी असून त्याने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये ही यश संपादन केलेले आहे.ओंकार यास लहानपणापासून परळी येथील आदर्श शिक्षक अरुण गीते यांचे मार्गदर्शन लाभले असे तो म्हणाला.

त्याच्या या यशाबद्दल शाळा, महाविद्यालयाचे शिक्षक वृंद, यांच्यासह नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान या यशाबद्दल यशचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार