620 गुण घेऊन डॉक्टर होण्याचा मार्ग सुकर केला

 परचुंडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बंडू पत्रावळे याचे नीट परीक्षेत घवघवीत यश




620 गुण घेऊन डॉक्टर होण्याचा मार्ग सुकर केला

परळी वैजनाथ/प्रतिनिधी 


*जिद्द, चिकाटी, प्रयत्न त्याचबरोबर आहे त्या परिस्थितीत आढेवेढे न घेता शिक्षण घेण्याची आवड असेल तर अशा मुळातच टॅलेंट असलेल्या विद्यार्थाला नशीब कधीच हुलकावणी देत नाही. अशीच मनाशी खूणगाठ बांधून बालाघाटच्या दुष्काळी पट्ट्यात असलेल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाने नीट परीक्षेत 620 गुण घेऊन आपला वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा केला आहे.*

परचुंडी ता.परळी वैजनाथ येथील सामान्य अल्पभूधारक होतकरू व प्रयोगशिल शेतकरी देवराव पत्रावळे व महानंदा पत्रावळे यांचा मुलगा बसवलिंग उर्फ बंडू याने माजलगाव येथील आपले आजी आजोबा सीताबाई व रामाप्पा शेटे यांचे कडे राहून सिध्देश्वर विद्यालयात प्राथमिक व दहावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण घेतले परिस्थिती सामान्य असतानाही अकरावी लातूर येथे तर बारावी पुणे येथे चिकाटीने पूर्ण केली. आई वडील व आजीचे कष्टाळू जीवन जवळून बघितलेल्या बंडूने घरची परिस्थिती बदलण्यासाठी डॉक्टर व्हायचे स्वप्न उरी बाळगले.व पुढील उच्च शिक्षणाच्या दृष्टीने मागच्या वर्षी नीट ची परीक्षा दिली होती परंतु अपेक्षित यश आले नाही तरीही मनाने खचून न जाता पुन्हा त्याने दुसऱ्यांदा प्रयत्न करून नुकतीच यावर्षीची नीट परीक्षा दिली. या नीट परीक्षेचा निकाल काल घोषित झाला त्यात त्याने ओबीसी कॅटेगिरितून  720 पैकी 620 गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्याला मुंबई पुणे औरंगाबाद सारख्या शहरातील  आवडत्या वैद्यकीय कॉलेज मध्ये प्रवेश मिळू शकतो.

 बंडू पत्रावळेच्या या घवघवीत यशा बद्दल बीड जील्हा वीरशैव सभा अध्यक्ष दताप्पा इटके, प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे, आदर्श शिक्षक अशोक नावंदे, परचुंडी गावच्या सरपंच सौ मीना गुरुलिंग आप्पा नावंदे, वैजनाथ पत्रावळे, सामाजिक कार्यकर्ते महादेव आप्पा इटके, दैनिक लोकमतचे वार्ताहर संजय खाकरे, वीरशैव सभेचे  प्रांत सदस्य अमरनाथ अप्पा खुरपे शिवाप्पा भुरे जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर अप्पा शेटे अशोक नावंदे सर शिवा संघटना माजलगाव अध्यक्ष पशुपतिअप्पा गवरकर  शिवहर अप्पा शेटे महेश अप्पा साडेगावकर पशुपति मिटकरी इश्र्वरप्पा खुरपे इत्यादींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार