पोस्ट्स

भगवानबाबाचे आशिर्वाद घेतले! वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय लढाई थांबणार नाही-फुलचंद कराड

इमेज
भगवानबाबाचे आशिर्वाद घेतले! वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय लढाई थांबणार नाही-फुलचंद कराड परळी/प्रतिनिधी वंजारी समाज दोन टक्के आरक्षणावर फार पूर्वीपासूनच नाखूष असून चांगले शिक्षण असूनही आरक्षण नसल्याने नोकरीच्या अनेक संधी समाजाच्या मुलांना दवडाव्या लागल्या आहेत. आता हे सगळं काही थांबलच पाहिले असे समाजाचे मत असून आज जयंती दिनी आम्ही गडावर संतश्री भगवानबाबांचा आशिर्वाद घेतला असून वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय आमचा लढा थांबणार नाही असा इशारा भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दिला. संतश्री भगवानबाबा यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी भगवान गडावर आज दि.31 ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केली होती. मठाधिपतीनी बैठकीस परवानगी नाकारल्याने गडावर काय होणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. दरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज फुलचंद कराड यांनी गडावर जावून बैठक घेत आता मोठे आंदोलन करूनच आपण आरक्षण मिळवूत अशी घोषणा केली. दुपारी भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड गडाकडे निघाले असता गडाच्या पायथ्याशी पोलिसांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. काही मोजक्याच समर्थकांसह आ

पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम

इमेज
पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम बीड, दि. 31:- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.     शनिवार दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता वाहनाने औरंगाबाद येथुन बीडकडे प्रयाण. सकाळी 12.00 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह बीड येथे आगमन व पोषण अभियान महिना कार्यशाळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 13.00 वाजता उसतोड, मजूर व मुकादम वाहतुकदार संघटनेच्या मेळाव्यास  उपस्थिती.  दुपारी 15.30 वाजता परळी वैजनाथकडे प्रयाण व यशश्री निवासस्थान परळी येथे आगमन व राखीव. रविवार दि. 2 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10.45 वाजता वाहनाने श्री. वैद्यनाथ मंदिर, परळी जि. बीडकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता श्री वैद्यनाथ मंदिर परळी येथे *डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज  (अहमदपुरकर )* यांच्या श्रावणमास तपोनुष्ठाण सोहळयाच्या सांगता कार्यक्रमास उपस्थिती व   सोईनुसार यशश्री निवासस्थान परळी येथे आगमन व राखीव. सोमवार दि. 3 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 9.00 वाजता

लाईफकेअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर च्या माध्यमातून केली जाणारी आरोग्यविषयक सेवा

इमेज
परळीतील शिबीर श्रावणानिमित्त  वैद्यनाथचरणी अर्पण केलेले आरोग्यसेवारुपी बिल्वपत्र - डॉ.अर्चना पाटील चाकूरकर ● श्रेयासाठी नाही तर सेवेसाठी वाटचाल● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...        लाईफ केयर हाॅस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत अधिकाधिक गरजुंना मोफत नव्हे तर अगदी माफक दरात आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. परळी येथे घेण्यात आलेल्या शिबीरात जवळपास ८ हजारांच्यावर रुग्णांना लाभ झाला. हे काम म्हणजे श्रावणानिमित्त  वैद्यनाथचरणी अर्पण केलेली आरोग्यसेवारुपी बिल्वपत्रच आहे. श्रेयासाठी नाही तर सेवेसाठी वाटचाल करणार असल्याचे उदगीर येथील लाईफ केयर हाॅस्पिटलच्या  अध्यक्षा डॉ.अर्चना पाटील चाकुरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.         परळीत तापोनुष्ठान सोहळ्यात शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उदगीर येथील लाईफ केयर हाॅस्पिटलच्या  अध्यक्षा डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांच्या पुढाकाराने वैद्यनाथ मंदिरच्या परिसरात २१ दिवस आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये विविध आजारांवर तपासण्या करण्यात आल्या,यामध

कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व रस शोषण करणा-या किडीचे व्यवस्थापण*

इमेज
*कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व रस शोषण करणा-या किडीचे व्यवस्थापण*   *बीड, दि.31:-* मराठवाडयातील शेतकरी बांधवांचा खरीप हंगाम हा महत्वाचा आहे. या हंगामाध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये झालेल्या पावसावर शेतक-यांनी कपाशीची लागवड केली आहे. सध्या कपाशी साधारणपणे 65-70 दिवसाची असून फुले लागुण बोंड तयार होण्याच्या अवस्थे मध्ये आहे.  कापुस पिकावर मोठया प्रमाणावर रस शोषण करणा-या किडींचा उदा. तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी व मावा यांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत असून या किडीमुळे कापसाच्या पानांचा हिरवा रंग कमी होऊन पाने तांबुस/लालसर दिसत असुन ती खालच्या बाजुस वाकडी झालेली दिसत आहे. तसेच कमी-अधिक प्रमाणात बोंडअळीचा सुध्दा प्रादुर्भाव कापशीवर दिसुन येत आहे. त्याचे सुध्दा नियंत्रण शेतकरी बांधवांनी करणे गरजेचे आहे. अशा परीस्थीतीत शेतकरी बांधवांनी कापुस पिकाचा हंगाम डिसेंबर-जानेवारी महिन्यातचं संपुष्टात आणावा. शेताच्या बांधावर कपाशीचे अवशेष त्वरीत नष्ट करावेत. गुलाबी बोंडअळीनं प्रादुर्भावग्रस्त कापसाची गोदामाध्ये साठपणुक करुन नये. गुलाबी बोडअळीचा जीनवक्रम खंडीत करण्यासाठी पिकांची फेरपालट करावी.

भक्ती -कर्म -ज्ञान मार्गाचा त्रिवेणी समन्वय : संत भगवानबाबा

इमेज
भक्ती -कर्म -ज्ञान मार्गाचा त्रिवेणी समन्वय : संत भगवानबाबा भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता.आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ,तेलंगना,आंध्रप्रदेश,कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते.  बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव येथे श्रावण वद्य पाच शके १८१८ (२९ जुलै, इ.स. १८९६), सोमवार रोजी सूर्योदयाच्या समयी भगवानबाबांचा जन्म झाला. मुलाचे नाव 'आबा' किंवा 'आबाजी' ठेवण्यात आले. त्यामुळे भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप. ते कौतिकाबाई आणि तुबाजीराव यां

खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते उद्या राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचे भूमिपूजन*

इमेज
*खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते उद्या राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचे  भूमिपूजन* _भगवानबाबांच्या जन्मभूमीत दोन एकर जागेवर साकारणार भव्य दिव्य स्मारक_ पाटोदा, दि. ३० -----  राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे भव्य दिव्य स्मारक त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे सावरगांव येथे उभारण्यात येणार आहे.  उद्या ३१ तारखेला त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते या स्मारकाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी स्मारक उभारण्याचा शब्द तमाम भक्तांना दिला होता, तो आता पूर्णत्वास येत आहे.      सावरगांव येथे सकाळी ११ वा. खासदार डाॅ प्रितमताई मुंडे या स्मारकाचे भूमिपूजन करणार असून पंचक्रोशीतील भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी  बाबांचं स्मारक व्हावं ही मनातली इच्छा व्यक्त करून त्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आपली भूमिका व्यक्त केली होती. राष्ट्रसंत भगवानबाबांच्या कार्याचा अखंड महाराष्ट्रभर

आजचे.......श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग शयन आरती,श्रृंगार दर्शन,

इमेज
(सर्व छायाचित्रे सौजन्य :राजेंद्रजी सोनी)   श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग शयन आरती,श्रृंगार दर्शन, 30 ऑगस्ट 18, गुरूवार परळी वैजनाथ, महाराष्ट्र

परळी तालुका पर्जन्यमान : दि. 30- 08 -2018

इमेज
दि. 30- 08 -2018 परळी तालुका पर्जन्यमान सिरसाळा        -  निरंक नागापुर           - निरंक पिंपळगाव गा.  - निरंक धर्मापुरी           - निरंक परळी वै .         - निरंक

परळीत श्रावणी संकष्टी चतुर्थी निमित्ताने गणेश मंदिरात भाविकांची गर्दी !

इमेज
 परळीत श्रावणी संकष्टी चतुर्थी  निमित्ताने गणेश मंदिरात भाविकांची गर्दी ! वैद्यनाथ मंदिर परिसरातील श्री. दक्षिणमुखी  गणेश मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे . (छायाचित्रे : अनंत कुलकर्णी, परळी वैजनाथ. ) ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••  परळी वैजनाथ / अनंत कुलकर्णी  . ...       हरि -हर ऐक्य क्षेत्र असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र परळी श्रावणी संकष्टी चतुर्थी निमित्ताने गजबजली आहे.  वैद्यनाथ मंदिर सह शहरातील विविध गणेश मंदिरे भाविकांनी गजबजून गेली. दर्शनासाठी भाविकांनी विविध मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली .भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी दाखल होत होते. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग व दक्षिणमुखी गणेश मंदिर येथे  दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे . @@@@ विविध मंदिरे गजबजली !       शहरातील विविध गणेश मंदिरे गजबजली होती. दक्षिणमुखी गणेश मंदिर, बसस्थानक गणेश मंदिर  आदी विविध मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. 

आरक्षणासाठी धनगर बांधवांचा ३१ला महामेळावा.

इमेज
आरक्षणासाठी धनगर बांधवांचा ३१ला महामेळावा. __________________________________ औरंगाबाद - धनगर समाजाचा एसटी. प्रवर्गात समावेश करून त्वरित आरक्षण द्या, या मागणीसाठी राज्यातील धनगर अनेक वर्षांपासून लढा देत आहे. परंतु, समाजाच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी राज्यातील संपूर्ण धनगर समाज एकवटला असून शुक्रवार दि. ३१ रोजी आमखास मैदानावर धनगर समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी लाखोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहतील, अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उत्तमराव जाणकर, शिवदास बिडकर, तानाजी सातपुते यांची उपस्थिती होती.

नांदेड-पनवेल-नांदेड साप्ताहिक विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ-48 फेऱ्या

इमेज
नांदेड-पनवेल-नांदेड साप्ताहिक विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ-48 फेऱ्या  परळी वैजनाथ /प्रतिनिधी. .. दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभाग पनवेल आणि पुणे येथील प्रवाश्यांची गर्दी आणि जनतेची मागणी वरून गाडी संख्या 07617 / 07618 नांदेड –पनवेल-नांदेड साप्ताहिक विशेष गाडी चालवीत आहे.  जनतेची मागणी लक्षात घेवून या विशेष गाडीच्या 48 फेऱ्या वाढविण्याचे ठरविले आहे.  हि गाडी दर शनिवारी सायंकाळी 17.30 वाजता नांदेड येथून सुटेल आणि रविवारी सकाळी 06.10 वाजता पुणे येथे तर 09.00 वाजता पनवेल येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात हि गाडी दर रविवारी सकाळी 10.00 वाजता पनवेल येथून सुटेल आणि पुणे येथून दुपारी 13.00 वाजता सुटून नांदेड येथे सोमवारी सकाळी 05.00 वाजता पोहोचेल. या गाडीस 21  डब्बे असतील. ज्यात दहा द्वितीय श्रेणी शय्या, 1 तृतीय श्रेणी वातानुकुलीत, 1 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत आणि 1 प्रथम श्रेणी तथा द्वितीय श्रेणी वातानुकुलीत डब्बे असतील. हि गाडी पुढील तारखेस नांदेड येथून सुटेल – गाडी संख्या 07617 – सप्टेंबर-1, 22, 29 , ऑक्टोंबर -6,13,20,27, नोवेंबर – 3, 10, 17, 24, डिसेंबर-1, 8, 1

अध्यात्म म्हणजे मनावर नियंत्रण मिळवणे होय-निवेदिता धावडे

इमेज
*अध्यात्म म्हणजे मनावर नियंत्रण मिळवणे होय-निवेदिता धावडे यांचे प्रतिपादन *परळीत श्रावणमास तपोनुष्ठान कार्यक्रमास भाविकांची तोबा गर्दी* *परळी/प्रतिनिधी* प्रापंचिक व्यक्ती हा मनाचे चोचले पुरवून त्याद्वारे सुख शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याला खरे सुख लाभत नाही. उलट मनावर नियंत्रण मिळवून परमार्थ साध्य करता येतेा व त्याद्वारे खऱ्या सुखाची अनुभूती येऊ शकते. मनावर नियंत्रण मिळविणे हेच अध्यात्म होय असे प्रतिपादन मुंबई येथील ख्यातनाम प्रवचनकार, किर्तनकार व सदगुरू वामनराव पै यांच्या शिष्या निवेदिता धावडे यांनी केले. दरम्यान परळी येथे दि.11 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या श्रावणमास तपोनुष्ठान सेाहळयास दिवसेंदिवस भाविकांची तोबा गर्दी वाढत असून कार्यक्रमाचा समारोप 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. वसुंधरारत्न, राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत सौ.धावडे या बोलत होत्या. वैद्यनाथ मंदिर परिसरातील श्री गुरूलिंग स्वामी मठ (बेलवाडी) समोरील श्री विश्र्वेश्वर मंडपात भाविकांना मन:स्वास्थ्य व अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन

भगवानगडावर कोणताही मेळावा किंवा बैठक नाही ; वंजारी समाजाच्या आरक्षण आंदोलनाची घोषणा करणार - फुलचंद कराड

इमेज
भगवानगडावर कोणताही मेळावा किंवा बैठक नाही वंजारी समाजाच्या आरक्षण आंदोलनाची घोषणा करणार - फुलचंद कराड बीड । प्रतिनिधी दि.31 ऑगस्ट रोजी संत श्री भगवानबाबा यांची जयंती असुन याच दिवशी वंजारी समाजाच्या आरक्षण प्रश्नावर केवळ आंदोलनाची घोषणा किंबहुना आंदोलनाची सुरूवात केली जाणार आहे. भगवानगड आमचे श्रद्धास्थान असुन या दिवशी गडावर आम्ही जाणार आहोत परंतु तेथे कोणती बैठक अथवा मेळावा होणार नाही तर संत श्री भगवानबाबाचे आशिर्वाद घेवून आंदोलनाच्या प्रश्नावर आम्ही मार्गस्थ होणार आहोत अशी माहिती भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. भगवानगडावर दि. 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय संत श्री भगवानबाबा यांच्या जयंतीचा कार्यक्रम असुन याचवेळी गडावर भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड आपल्या समर्थकांसह जाणार आहेत. भगवानगडावर आरक्षण प्रश्नावर बैठक अथवा मेळावा घेण्याचा आमचा यापुर्वीही कधीही विचार नव्हता, आणि आताही नाही. आम्ही भगवानगडाला आमचे श्रद्धास्थान मानत असुन गडाचा सन्मान राखणे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे जयंतीच्या दिवशी आम्ही गडावर जावुन भगवानबाबांचे दर्शन घेणार आहोत. याठिकाणी बाबांच

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ.

इमेज
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ. _________________________________ मोदी सरकारने केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना एक खूशखबर दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या सात टक्के महागाई भत्ता मिळतो. मात्र आता त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ झाल्यामुळे 9 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याआधी मार्चमध्ये 2 टक्क्यांनी वाढ दिली होती. 1 जानेवारीपासून ती लागू करण्यात आली होती. सातव्या वेतन आयोगात निश्चित केलेल्या फॉर्म्युल्यानुसार महागाई भत्त्यात वाढ झाली. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर एक जुलैपासून हा निर्णय लागू होईल. देशभरात 48 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आहेत तर 61 लाखांपेक्षा अधिक पेन्शनधारक मंडळी आहेत.

भाजपच्या सत्ता परिवर्तनात रासपचे योगदान मोलाचे - ना. पंकजा मुंडे

इमेज
*भाजपच्या सत्ता परिवर्तनात रासपचे योगदान मोलाचे* *_ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पार पडला रासपचा स्थापना दिवस_* नवी दिल्ली दि. २९ ---- रासप हा अठरा पगड जाती जमातीला सोबत घेवून काम करणारा पक्ष असून भाजपच्या सत्ता परिवर्तनाच्या लढाईत त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. या पक्षाचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.    रासपचा पंधरावा स्थापना दिन समारोह आज दिल्लीतील काॅन्स्टीट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. रासपचे अध्यक्ष तथा राज्याचे पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर व रासपचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.    रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे माझे बंधू आहेत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात आमचे बहिण-भावाचे नाते अतूट असं आहे, मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या लढाईतून आम्ही खूप कांही शिकलो, त्यांनी दाखविलेल्या साहस आणि संयमाच्या मार्गावर वाटचाल करत पुढे जात असल्याचे ना

ज्योतिर्लिंगक्षेत्र परळीच्या १३३ कोटीच्या विकास आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीची मंजुरी !

इमेज
 बीड. ज्योतिर्लिंगक्षेत्र परळीच्या १३३ कोटीच्या विकास आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीची  मंजुरी ! परळी वैजनाथ /प्रतिनिधी...       पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या शंभर कोटींच्या विकास आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये वर्षभर भाविकांची सतत दर्शनासाठी गर्दी असते. असे असले तरी या देवस्थानचा भीमाशंकर व घृष्णेश्‍वर प्रमाणे अद्यापही विकास झालेला नाही. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांना राहण्यासह इतर अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. येथे श्रावण महिना, महाशिवरात्री यासह इतर वेळीही भाविकांची मोठी गर्दी असते. येथे येणार्‍या भाविकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, देवस्थानचा विकास व्हावा, यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी 133 कोटी 59 लाख 19 हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.          यासाठीचा आराखडा जिल्हास्तरीय समितीने मंजूर केला असून तो नगरविकास खात्याकडे पाठविण्यात येणार आहे. यानंतर उच्चस्तरीय समिती व शिखर समिती या आराखड्यासा

संगीत क्षेत्रात यश..... परळीचा शंकर गुट्टे शिष्यवृत्तीस पात्र

इमेज
परळीचा शंकर गुट्टे शिष्यवृत्तीस पात्र  परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...          अतिशय बिकट परिस्थितीवर मात करीत यशाचे व ध्येयाचे उंच शिखर गाठता येते हे नेहमीच ग्रामीण भागातील सर्वसामान्यांनी सिद्ध केले आहे .अशीच प्रचिती संगीत क्षेत्राला येत आहे .चि. शंकर दामोदर गुट्टे हा परळी तालुक्यातील कासारवाडी या अतिशय दुर्गम भागातून अंबाजोगाईसारख्या विद्येच्या माहेरघरात संगीत शिक्षणासाठी दररोज ये-जा करतो .पं. शिवदासजी देगलूरकर यांच्या "बालगंधर्व संगीत महाविद्यालय व गुरुकुल "येथे श्री.प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सांगीतिक प्रवास चालू आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई या सांगीतिक क्षेत्रातील अतिशय नामवंत संस्थेने संगीतक्षेत्रातील प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली व त्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन केले. त्या स्पर्धेमध्ये चि. शंकरने आपल्या गायनाने रसिकांना व परीक्षकांना मंत्रमुग्ध करत शिष्यवृत्ती मिळवली. याआधीही" झी टीव्हीच्या सारेगमप "या सांगीतिक कार्यक्रमात अंतिम 30 मध्ये जाण्याची किमया शंकरने साधली होती. श्री. बंडोपंत ढाकणे या

फसलेला नोटाबंदी निर्णय म्हणजे ..! विळा मोडून खिळा केला'.

इमेज
RBI च्या आजच्या अहवालातून #नोटाबंदी चा निर्णय फसला हे सिद्ध झाले आहे. 99.3% नोटा परत आल्या. रोजगार बुडाला,उद्योगधंदे, लघुउद्योग बुडाले, शेतकरी,शेतमजुर बुडाला.अर्थव्यवस्था उध्वस्त झाली.ग्रामीण भाषेत सांगायचे तर सरकारने हा विक्षिप्त निर्णय घेऊन 'विळा मोडून खिळा केला'.

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा 23 नोव्हेंबरला

इमेज
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा 23 नोव्हेंबरला * ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 17 सप्टेंबरपासून नागपूर, दि. 28 : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विनामुल्य परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. या प्रशिक्षणात प्रवेशाकरिता संस्थेच्या वतीने शुक्रवार, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेत प्रवेशाकरिता इच्छूक विद्यार्थी दिनांक 17 सप्टेंबर ते 31 संस्थेच्या संकेतस्थळ www.preiasnagpur.org.in वरुन ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील. दिनांक 12 ते 23 नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा पत्र उपलब्ध करून देण्यात येईल. परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंबंधीची माहिती, परिक्षेसंबंधी सूचनेची विस्तृत माहिती संस्थेच्या संकेतस्थळ www.preiasnagpur.org.inवर उपलब्ध असल्याचे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेचे संचालक

परळी वैजनाथ : आजचे पर्जन्यमान. .....

इमेज
दि. 29- 08 -2018 परळी तालुका पर्जन्यमान सिरसाळा        -  निरंक नागापुर           - 5.00 पिंपळगाव गा.  - निरंक धर्मापुरी           - 7.00 परळी वै .         - 8.00

मंत्रिमंडळ निर्णय : (एकूण-3) ..... दि. 29 ऑगस्ट 2018

इमेज
मंत्रिमंडळ निर्णय : (एकूण-3) दि. 29 ऑगस्ट 2018 शेतीच्या आधुनिकीकरणासाठी राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेस मान्यता शेतीच्या आधुनिकीकरणासाठी शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारी 100 टक्के राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना यंदाच्या आर्थिक वर्षापासून (2018-19) राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे उच्च तंत्रज्ञानाधारित कृषीयंत्रांचे हब तयार होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी केंद्र शासनासह राज्य शासनाकडूनही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांना सहाय्यभूत ठरणारी कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यानुसार कृषि अवजारे-यंत्रांच्या खरेदीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासह कृषि अवजारे बँकांनाही अनुदान देण्यात येणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसह अनुसूचित जाती-जमाती आणि महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी 35 टक्के तर इतर बाबींसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येईल. तसेच इतर लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी 25 टक्के तर इतर बाबींसाठी 40 ट

50 हजारांपेक्षा जास्त वीट निर्मिती करणाऱ्या भट्टीधारकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक

इमेज
50 हजारांपेक्षा जास्त वीट निर्मिती करणाऱ्या भट्टीधारकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक - पर्यावरण मंत्री रामदास कदम मुंबई, दि. 28 : राज्यात पारंपरिक विटांची निर्मिती करत असताना 50 हजारांपेक्षा जास्त वीट निर्मिती करणाऱ्या वीट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक राहील,  असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज येथे सांगितले. आज मंत्रालयात महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या श्री.कदम शिष्टमंडळाने पारंपरिक वीट भट्टीसंदर्भात पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी पर्यावरण मंत्री बोलत होते. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्री. कदम म्हणाले, एकावेळी 50 हजारापेक्षा कमी विटांची निर्मिती करत असल्यास त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक नसेल. मात्र 50 हजारापेक्षा जास्त वीट निर्मिती करत असतील तर अशा वीट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक राहील. तसेच एकावेळी 50 हजारांच

परळीच्या महिला महाविद्यालयाला शासनाचा पुरस्कार

इमेज
 राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय पुरस्कार : परळीचे महिला महाविद्यालय सर्वोत्कृष्ट तर डॉ. प्रा.एल. एस. मुंडे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी परळी वैजनाथ/ प्रतिनिधी ....          महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेसाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी यावर्षी परळीच्या कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची निवड झाली आहे तर याच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रा.एल.एस. मुंडे यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.     राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सन 2017-2018 मध्ये निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांचे स्वरूप राज्यस्तरीय आहे. यावर्षीच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी राज्यातून सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट विद्यापीठ, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक व सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कारांसाठी निवड झालेल्या व्यक्ती व संस्थांची यादी नुकतीच राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.  

29 ऑगष्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचे अवाहन

इमेज
29 ऑगष्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचे अवाहन बीड, दि.28:- महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार शहरी भागात आढळतो.  जोपर्यंत ग्रामीण  भागातील नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहचविले जाणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये क्रीडा विषयक जाणीव व वातावरण निर्माण होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने क्रीडा व खेळाची प्रगती साध्य करणे शक्य होणार नाही.  ही वस्तुस्थिती लक्षात घेता शासनाने सन 1991-92 यावर्षी पासून दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निमार्ण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्हयात दरवर्षी क्रीडा सप्ताह व मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगार) यांचा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास क्रीडा विभागाने सन 1997 पासून मान्यता दिलेली आहे.  त्या अनुषंगाने दि. 29 ऑगस्ट हा क्रीडा दिन व दि. 12 ते 18 डिसेंबर हा कालावधी क्रीडा सप्ताह म्हणून राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येतो.   जिल्हयातील शाळा,

*‘सही पोषण, देश रोशन’*......राज्यात 1 सप्टेंबरपासून ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम*

इमेज
*राज्यात 1 सप्टेंबरपासून ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम* *मोहीमेला जनचळवळीचे स्वरुप देण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन* मुंबई, दि. 28 : कुपोषणमुक्तीच्या कार्यक्रमाला गती देण्याच्या तसेच जनमानसात विशेषत: पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 दरम्यान राज्यात ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला -बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून महाराष्ट्रात या उपक्रमाला जनचळवळीचे स्वरुप देण्यासाठी यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. *‘सही पोषण, देश रोशन’* असे घोषवाक्य या मोहीमेसाठी निश्चित करण्यात आले आहे. बालकांमधील कुपोषण, खुजेपणा, बुटकेपणा, रक्तक्षय कमी करणे, किशोरवयीन मुली आणि महिलांमधील रक्तक्षय कमी करणे, जन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करणे आदी उद्दीष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत. महिला आणि बालविकास विभाग हा या मोहीमेचा नोडल विभाग म्हणून काम करणार असून