खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते उद्या राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचे भूमिपूजन*


*खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते उद्या राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचे  भूमिपूजन*

_भगवानबाबांच्या जन्मभूमीत दोन एकर जागेवर साकारणार भव्य दिव्य स्मारक_

पाटोदा, दि. ३० -----  राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे भव्य दिव्य स्मारक त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे सावरगांव येथे उभारण्यात येणार आहे.  उद्या ३१ तारखेला त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते या स्मारकाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी स्मारक उभारण्याचा शब्द तमाम भक्तांना दिला होता, तो आता पूर्णत्वास येत आहे.

     सावरगांव येथे सकाळी ११ वा. खासदार डाॅ प्रितमताई मुंडे या स्मारकाचे भूमिपूजन करणार असून पंचक्रोशीतील भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी  बाबांचं स्मारक व्हावं ही मनातली इच्छा व्यक्त करून त्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आपली
भूमिका व्यक्त केली होती. राष्ट्रसंत भगवानबाबांच्या कार्याचा अखंड
महाराष्ट्रभर नावलौकिक आहे, त्या अनुषंगानेच त्यांच्या जन्मगावी त्यांचं
स्मारक असावं हा शुद्ध आणि प्रामाणिक हेतू समोर ठेवून ना.पंकजाताईंच्या
नेतृत्वात भगवानबाबांचं भव्य स्मारक सावरगाव येथे उभा राहत आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर तितक्याच आत्मियतेने दिलेल्या शब्दाला जागून समाजाच्या जिव्हाळ्याचा विषय
ना.पंकजाताई व खा.डॉ.प्रितमताई यांच्यामार्फत योग्य रितीने हाताळला जात
असल्याने भगवानबाबा भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहेत.
 सर्वसामान्य घटकाला सोबत घेऊन राजकारण, समाजकारण करताना ‘दिलेला शब्द पाळणारं नेतृत्व’ ही ओळख आता मुंडे भगिनींची होत आहे. अत्याधुनिक मशिनरींच्या
साहाय्याने या कामाची युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे
लवकरच भगवानबाबांचं हे स्मारक पूर्णत्वास जाणार असल्याने तमाम भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार