भगवानबाबाचे आशिर्वाद घेतले! वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय लढाई थांबणार नाही-फुलचंद कराड


भगवानबाबाचे आशिर्वाद घेतले! वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय लढाई थांबणार नाही-फुलचंद कराड
परळी/प्रतिनिधी
वंजारी समाज दोन टक्के आरक्षणावर फार पूर्वीपासूनच नाखूष असून चांगले शिक्षण असूनही आरक्षण नसल्याने नोकरीच्या अनेक संधी समाजाच्या मुलांना दवडाव्या लागल्या आहेत. आता हे सगळं काही थांबलच पाहिले असे समाजाचे मत असून आज जयंती दिनी आम्ही गडावर संतश्री भगवानबाबांचा आशिर्वाद घेतला असून वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय आमचा लढा थांबणार नाही असा इशारा भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दिला.
संतश्री भगवानबाबा यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी भगवान गडावर आज दि.31 ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केली होती. मठाधिपतीनी बैठकीस परवानगी नाकारल्याने गडावर काय होणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. दरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज फुलचंद कराड यांनी गडावर जावून बैठक घेत आता मोठे आंदोलन करूनच आपण आरक्षण मिळवूत अशी घोषणा केली.

दुपारी भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड गडाकडे निघाले असता गडाच्या पायथ्याशी पोलिसांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. काही मोजक्याच समर्थकांसह आपण गडावर जावून दर्शन घ्यावे अशी सूचना पोलिसांनी केली. या पार्श्वभूमीवर कराड गडावर गेले, त्यांनी संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेवून गाभाऱ्याबाहेर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
गडाच्या बाहेर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतंाना फुलचंद कराड म्हणाले की, वंजारी समाजाची एकुण संख्या लक्षात घेता दोन टक्के अत्यंत अपुरे असून आम्हाला पुन्हा ओबीसीत घ्यायला हवे. चांगले आरक्षण नसल्याने वंजारी समाजाचे तरूण विद्यार्थी चांगले शिक्षण घेवून सुद्धा नोकरीपासून वंचित असून आता आरक्षणाशिवाय ही लढाई थांबणार नसल्याचेत्यांनी सांगितले. 16 सप्टेंबरला पुण्यात वंजारी समाजाची आरक्षण प्रश्नी राज्यव्यापी बैठक होत असून नियोजनबद्ध पद्धतीने एकुण आंदोलनाची आखणी करण्यासोबतच आरक्षणाच्या मुद्यावर आता कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही असा इशारा कराड यांनी दिला. एकुण आजचा कार्यक्रम पुर्णपणे शांततेत पार पडला असून गडाच्या कोणत्याही आचारसंहितेचे आम्ही उल्लंघन केले नसल्याचे भगवानसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार