युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

नांदेड-पनवेल-नांदेड साप्ताहिक विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ-48 फेऱ्या



  • नांदेड-पनवेल-नांदेड साप्ताहिक विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ-48 फेऱ्या 


परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ..

दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभाग पनवेल आणि पुणे येथील प्रवाश्यांची गर्दी आणि जनतेची मागणी वरून गाडी संख्या 07617 / 07618 नांदेड –पनवेल-नांदेड साप्ताहिक विशेष गाडी चालवीत आहे.  जनतेची मागणी लक्षात घेवून या विशेष गाडीच्या 48 फेऱ्या वाढविण्याचे ठरविले आहे.  हि गाडी दर शनिवारी सायंकाळी 17.30 वाजता नांदेड येथून सुटेल आणि रविवारी सकाळी 06.10 वाजता पुणे येथे तर 09.00 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात हि गाडी दर रविवारी सकाळी 10.00 वाजता पनवेल येथून सुटेल आणि पुणे येथून दुपारी 13.00 वाजता सुटून नांदेड येथे सोमवारी सकाळी 05.00 वाजता पोहोचेल.

या गाडीस 21  डब्बे असतील. ज्यात दहा द्वितीय श्रेणी शय्या, 1 तृतीय श्रेणी वातानुकुलीत, 1 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत आणि 1 प्रथम श्रेणी तथा द्वितीय श्रेणी वातानुकुलीत डब्बे असतील.
हि गाडी पुढील तारखेस नांदेड येथून सुटेल –
गाडी संख्या 07617 – सप्टेंबर-1, 22, 29 , ऑक्टोंबर -6,13,20,27, नोवेंबर – 3, 10, 17, 24, डिसेंबर-1, 8, 15, 22, 29-2018 , जानेवारी-5, 12, 19, 26, फेब्रुवारी-2, 9, 16, 23-2019 एकूण 24 फेऱ्या

परतीच्या प्रवासात गाडी संख्या 07618 हि पनवेल येथून पुढील तारखेस सुटेल –      
सप्टेंबर- 2,,23,30, ऑक्टोंबर – 7,14,21,28, नोवेंबर – 4,11,18,25,डिसेंबर- 2,9,16,23,30,-2018 , जानेवारी-6,13,20,27, फेब्रुवारी-  3,10,17,24, – 2019 एकूण 24 फेऱ्या


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या