परळीत श्रावणी संकष्टी चतुर्थी निमित्ताने गणेश मंदिरात भाविकांची गर्दी !

परळीत श्रावणी संकष्टी चतुर्थी निमित्ताने गणेश मंदिरात भाविकांची गर्दी !
![]() |
वैद्यनाथ मंदिर परिसरातील श्री. दक्षिणमुखी गणेश मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे . (छायाचित्रे : अनंत कुलकर्णी, परळी वैजनाथ. ) •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• |
हरि -हर ऐक्य क्षेत्र असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र परळी श्रावणी संकष्टी चतुर्थी निमित्ताने गजबजली आहे. वैद्यनाथ मंदिर सह शहरातील विविध गणेश मंदिरे भाविकांनी गजबजून गेली. दर्शनासाठी भाविकांनी विविध मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली .भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी दाखल होत होते. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग व दक्षिणमुखी गणेश मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे .
@@@@
विविध मंदिरे गजबजली !
शहरातील विविध गणेश मंदिरे गजबजली होती. दक्षिणमुखी गणेश मंदिर, बसस्थानक गणेश मंदिर आदी विविध मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
छान पप्पूसेठा
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा