अध्यात्म म्हणजे मनावर नियंत्रण मिळवणे होय-निवेदिता धावडे

*अध्यात्म म्हणजे मनावर नियंत्रण मिळवणे होय-निवेदिता धावडे यांचे प्रतिपादन


*परळीत श्रावणमास तपोनुष्ठान कार्यक्रमास भाविकांची तोबा गर्दी*

*परळी/प्रतिनिधी*

प्रापंचिक व्यक्ती हा मनाचे चोचले पुरवून त्याद्वारे सुख शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याला खरे सुख लाभत नाही. उलट मनावर नियंत्रण मिळवून परमार्थ साध्य करता येतेा व त्याद्वारे खऱ्या सुखाची अनुभूती येऊ शकते. मनावर नियंत्रण मिळविणे हेच अध्यात्म होय असे प्रतिपादन मुंबई येथील ख्यातनाम प्रवचनकार, किर्तनकार व सदगुरू वामनराव पै यांच्या शिष्या निवेदिता धावडे यांनी केले. दरम्यान परळी येथे दि.11 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या श्रावणमास तपोनुष्ठान सेाहळयास दिवसेंदिवस भाविकांची तोबा गर्दी वाढत असून कार्यक्रमाचा समारोप 2 सप्टेंबर रोजी होणार आहे.

वसुंधरारत्न, राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत सौ.धावडे या बोलत होत्या. वैद्यनाथ मंदिर परिसरातील श्री गुरूलिंग स्वामी मठ (बेलवाडी) समोरील श्री विश्र्वेश्वर मंडपात भाविकांना मन:स्वास्थ्य व अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन करतांना त्या पुढे म्हणाल्या की, समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या मनाचे श्लोक द्वारे मनाचा व्यापार उलगडून दाखविला आहे. मनाचे श्लोक हे केवळ पाठ करावयाचे नसतात तर जीवनात त्यांची अनुभूती घ्यावयाची असते.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, माणसाचे बर्हिमन हे छोटे असून अंतर्मन हे खूप मोठे आहे. बर्हिमन हे शेतकरी आहे तर अंतर्मन ही शेती आहे. आपले बर्हिमन जे पेरते तेच अंतर्मनात उगवते. आपण एखादे वाहन घेतो तेंव्हा असे वाटते की, आपल्याला त्याद्वारे आनंद मिळेल. पण वाहन हे आपल्याला केवळ एखाद्या ठिकाणी नेऊ शकते, ते आनंद देऊ शकत नाही. आपल्याकडे आनंद असेल तर आपण तो आनंद देऊन गाडी विकत घेऊ शकत नाही आणि आपल्याकडे गाडी असेल तर आनंद मिळू शकत नाही. पैसा आणि गाडी या भौतिक बाबी आहेत आणि आनंद ही सुक्ष्म बाब आहे. भौतिक वस्तुंनी आपल्याला भौतिक वस्तुच मिळवता येतात तर सुख आणि आनंद मिळण्यासाठी आपल्या मनावर ताबा मिळवावा लागतो.

आपल्याकडे घोडा असेल आणि आपण त्यावर बसले तर आपला प्रवास सुखकर होतो, पण हाच घोडा आपल्या मानगुटीवर बसला तर आपला प्रवास दु:खदायक होतो. आपले मन म्हणजे घोडा असून आपण त्याला ताब्यात ठेवले पाहिजे. आनंद हा बाहेर नसून आपल्या आतच आहे. त्याचप्रमाणे आपल्या वाटेला आलेले भोग हे आपल्या पूर्वजन्माचे संचित आहे हे आपण समजून घेतले पाहिजे तरच आपल्याला दु:ख वाटणार नाही असेही सौ.निवेदिता धावडे म्हणाल्या.

        कार्यक्रमास श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे, तपोनुष्ठान समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर, गिरीष बेबळगे, वैजनाथ बागवाले, कार्याध्यक्ष शाहुराव ढोबळे, कोषाध्यक्ष सोमनाथ निलंगे, सचिव संतोष पंचाक्षरी, सहसचिव सोमनाथ गोपनपाळे, चन्नबसअप्पा गिरवलकर, पोपडे अप्पा, अशोक नावंदे, समन्वयक अ‍ॅड.गिरीष नरवणे, नंदकुमार खानापुरे, ओमप्रकाश बुरांडे, सदानंद चौधरी, वैजनाथ निलंगे, मकरंद नरवणे, अरविंद चौधरी,  चंद्रशेखर फुटके, संजय खाकरे, कैलास रिकिबेे, राजाभाऊ हलकंचे, बाबासाहेब शिगे, रमेशअप्पा सपाटे, मन्मथ नरवणे, संजय कोरे, शिवशंकर नाईक, रमेश काळे, बाबासाहेब चौधरी, प्रा.अमर आलदे, योगीराज बर्दापुरे, मनोज बेंबळगे, सचिन सौंदळे, कपिल चौधरी, चंदुअप्पा हालगे, संतोष जुजगर, महादेव गित्ते, दयानंद चौधरी, शिरीष सलगरे, नागेश अलबिदे, संदिप चौधरी, वैजनाथ (बबन) शेटे, राजाभाऊ नरवणे,  शिवा सोरडगे, जगदिश महागांवकर, मनोज संकाये यांच्यासह इतर सदस्य  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !