कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व रस शोषण करणा-या किडीचे व्यवस्थापण*

*कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व रस शोषण करणा-या किडीचे व्यवस्थापण*

  *बीड, दि.31:-*

मराठवाडयातील शेतकरी बांधवांचा खरीप हंगाम हा महत्वाचा आहे. या हंगामाध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये झालेल्या पावसावर शेतक-यांनी कपाशीची लागवड केली आहे. सध्या कपाशी साधारणपणे 65-70 दिवसाची असून फुले लागुण बोंड तयार होण्याच्या अवस्थे मध्ये आहे.  कापुस पिकावर मोठया प्रमाणावर रस शोषण करणा-या किडींचा उदा. तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी व मावा यांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत असून या किडीमुळे कापसाच्या पानांचा हिरवा रंग कमी होऊन पाने तांबुस/लालसर दिसत असुन ती खालच्या बाजुस वाकडी झालेली दिसत आहे. तसेच कमी-अधिक प्रमाणात बोंडअळीचा सुध्दा प्रादुर्भाव कापशीवर दिसुन येत आहे. त्याचे सुध्दा नियंत्रण शेतकरी बांधवांनी करणे गरजेचे आहे. अशा परीस्थीतीत शेतकरी बांधवांनी कापुस पिकाचा हंगाम डिसेंबर-जानेवारी महिन्यातचं संपुष्टात आणावा. शेताच्या बांधावर कपाशीचे अवशेष त्वरीत नष्ट करावेत. गुलाबी बोंडअळीनं प्रादुर्भावग्रस्त कापसाची गोदामाध्ये साठपणुक करुन नये. गुलाबी बोडअळीचा जीनवक्रम खंडीत करण्यासाठी पिकांची फेरपालट करावी. पतंगाच्या हालचालिवर लक्ष्य ठेवण्यासाठी पेरणीच्या 45 दिवसानंतर हेक्टरी 5 याप्रमाणे कामगंध सापळे लावावेत. मान्यता असलेल्या व शिफारस केलेल्या किटकनाशकांचीच फवारणी करावी. जहाल विषारी किंवा उच्च विषारी गटातील किटकनाशकांची फवारणी टाळावी. आर्थिक नुकसान पातळ(8 पतंग प्रति कामगंध साफळा प्रति दिन सतत तीन दिवस किंवा 1 अळी प्रति 10 फुले किंवा 1 अळी प्रति 10 हिरवी बोंडे) ओलांडल्यास पुढील दिल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाचा गरजेनुसार वापर करावा.
  रस शोषण करणा-या किडींचे व्यवस्थापणासाठी तसेच मावा,पांढरी माशी,तुडतुडे,फुलकिडे याकीडीसाठी ब्युप्रोफेझीन 25%SC या किटकनाशकाचा प्रति हेक्टर 1000मिली/ 500लि पाणी  वापर करुन फवारणी करावी. तुडतुडे,फुलकिडे याकीडीसाठी सापरमेथ्रिन 25%EC  या किटकनाशकाचा प्रति हेक्टर 160मिली/400लि पाणी  वापर  करुन फवारणी करावी.  मावा,पांढरी माशी,तुडतुडे,फुलकिडे  याकीडीसाठी फिप्रोनिल 5% SC या किटकनाशकाचा प्रति हेक्टर 1500मिली/500लि पाणी वापर करुन फवारणी करावी. मावा,पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे याकीडीसाठी प्लोनिकॅमीड 50%wg या किटकनाशकाचा प्रति हेक्टर 150ग्रॅम/500लि पाणी  वापर  करुन फवारणी करावी.  तसेच कापुस पिकावरी शेंदरी बोडअळीसाठी  प्रोफेनोफॉस 50%ec हे किटक नाशक प्रति हेक्टरी 20मिली प्रमाणे  वापर करावे, क्लोरोपायरीफॉस 50EC हे किटक नाशक प्रति हेक्टरी 20मिली प्रमाणे  वापर करावे, लँबडा सायलोथ्रिन 5% EC हे किटक नाशक प्रति हेक्टरी 8 मिली प्रमाणे  वापर करावे, क्लोरोपायरीफॉस 50EC+ सापरमेथ्रिन 5%EC  हे किटक नाशक प्रति हेक्टरी 20मिली प्रमाणे  वापर करावे, ईमामेक्टीन बेंझोएट 5%SG हे किटक नाशक प्रति हेक्टरी 20मिली प्रमाणे  वापर करावे, आदीचा बाबींचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन डी.पी.जाधव, तालुका कृषि अधिकारी बीड यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !