इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



पालकमंत्री ना.पंकजा मुंडे
यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम

बीड, दि. 31:- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
   
शनिवार दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता वाहनाने औरंगाबाद येथुन बीडकडे प्रयाण. सकाळी 12.00 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह बीड येथे आगमन व पोषण अभियान महिना कार्यशाळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 13.00 वाजता उसतोड, मजूर व मुकादम वाहतुकदार संघटनेच्या मेळाव्यास  उपस्थिती.  दुपारी 15.30 वाजता परळी वैजनाथकडे प्रयाण व यशश्री निवासस्थान परळी येथे आगमन व राखीव.
रविवार दि. 2 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10.45 वाजता वाहनाने श्री. वैद्यनाथ मंदिर, परळी जि. बीडकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता श्री वैद्यनाथ मंदिर परळी येथे *डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज  (अहमदपुरकर )* यांच्या श्रावणमास तपोनुष्ठाण सोहळयाच्या सांगता कार्यक्रमास उपस्थिती व   सोईनुसार यशश्री निवासस्थान परळी येथे आगमन व राखीव.
सोमवार दि. 3 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 9.00 वाजता वाहनाने बीडकडे प्रयाण.सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आगमन व   जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीस उपस्थिती.सकाळी 11.15 वाजता वाहनाने पिंपळवाडी,लिंबागणेशमार्गे बेलेश्वर मंदिर तालुका जि. बीडकडे प्रयाण. सकाळी 12.00 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांचे लोकार्पण व भुमीपूजनास उपस्थिती.  दुपारी 14.30 वाजता वाहनाने  औरंगाबादकडे प्रयाण.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!