लाईफकेअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर च्या माध्यमातून केली जाणारी आरोग्यविषयक सेवा


परळीतील शिबीर श्रावणानिमित्त  वैद्यनाथचरणी अर्पण केलेले आरोग्यसेवारुपी बिल्वपत्र - डॉ.अर्चना पाटील चाकूरकर

● श्रेयासाठी नाही तर सेवेसाठी वाटचाल●


परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...

       लाईफ केयर हाॅस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत अधिकाधिक गरजुंना मोफत नव्हे तर अगदी माफक दरात आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. परळी येथे घेण्यात आलेल्या शिबीरात जवळपास ८ हजारांच्यावर रुग्णांना लाभ झाला. हे काम म्हणजे श्रावणानिमित्त  वैद्यनाथचरणी अर्पण केलेली आरोग्यसेवारुपी बिल्वपत्रच आहे. श्रेयासाठी नाही तर सेवेसाठी वाटचाल करणार असल्याचे उदगीर येथील लाईफ केयर हाॅस्पिटलच्या  अध्यक्षा डॉ.अर्चना पाटील चाकुरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

        परळीत तापोनुष्ठान सोहळ्यात शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उदगीर येथील लाईफ केयर हाॅस्पिटलच्या  अध्यक्षा डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांच्या पुढाकाराने वैद्यनाथ मंदिरच्या परिसरात २१ दिवस आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये विविध आजारांवर तपासण्या करण्यात आल्या,यामध्ये विविध राज्यातल्या ८००० हुन अधिक रुग्णांनी नोंदणी केली.यापैकी ५५० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अँजिओप्लास्टी,बायपास सर्जरी,मेंदूविकार शस्त्रक्रिया,किडनीचे विकार, मोतीबिंदू ,कानाचे श्रवण यंत्र यासारख्या आजारावर मार्गदर्शन केले गेले.परळी परिसरात अशा प्रकारचे पहिलेच आरोग्य शिबीर लाईफ केयर हॉस्पिटल करून आयोजित करण्यात आले होते.

        लाईफ केयर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर च्या वतीने पहिल्यांदाच २१ दिवसांचे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो अशी माहिती अध्यक्षा डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांनी दिली.आप्पांच्या आशीर्वादामुळेच रुग्णांची सेवा करण्याचा ध्यास घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. वैद्यनाथ मंदिर परिसरात देवस्थान ट्रस्ट ने जागा उपलब्ध करून दिल्यास मंदिर परिसरात कायमस्वरूपी आरोग्य कक्ष उभारण्याचा लाईफ केयर हॉस्पिटल चा मानस असल्याचे डॉ.अर्चना चाकूरकर यांनी सांगितले.

     या शिबिरात अॅन्जीओप्लास्टी, बायपास सर्जरी, मेंदुविकार शस्रक्रिया, मुतखडा (किडनी स्टोन ), लघवीचा त्रास (प्रोस्टेट ग्रंथी वाढणे), किडनीचे इतर विकार, मोतीबिंदु शस्त्रक्रिया व कानाचे श्रवण यंत्र या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आले, तसेच मोफत योजनेत समाविष्ट नसलेल्या आजारापैकी  मुळव्याध, अॅपेन्डीक्स, हार्निया, भगंदर, पाय खाली-वर होणे (हायड्रोसील) गर्भाशयाच्या पिशवीचे आॅपरेशन, सिझेरीयन सेक्शन आदी सेवेचाही रुग्णानी लाभ घेतला.
        शिबिरानिमित्त लाईफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने इतर मोठया शस्त्रक्रिया  (उदा. न्युरो सर्जरी, कॅन्सर, अपघात रुग्ण) यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पंतप्रधान सहाय्यता निधी, श्री सिध्दी विनायक ट्रस्ट, मुंबई तसेच अन्य धर्मादाय संस्था यांचे आरोग्य विषयक सुविधा व सेवा सहकार्य मिळविण्याबाबत गरजु रुग्ण व नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यात आले.
          माजी केंद्रीय गृहमंत्री  शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रेरणेतून उभारण्यात आलेल्या लाईफकेअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या स्थापनेपासून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. लाईफकेअर येथे महात्मा फुले जण आरोग्य योजने सोबतच पोलीस कुटुंब आरोग्य योजना सुरु आहे, महावितरण च्या कर्मचाऱ्यांसाठी विविध उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत आहेत. विविध विमा कंपनीशी टायअप असल्यामुळे शासकीय तसेच खाजगी नोकरी करणाऱ्या परंतु मेडिक्लेम असण्याऱ्या सर्वाना विनाखर्च उपचार करून घेता येतात अशी माहिती त्यांनी दिली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार