*....तर मोदी 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील - धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली भीती*
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiGZvLGBx-m4zxe30dZO0cMpdkhB1w_jI1kOh1yATb3rfQTghvKNUlM7nnHVISlmuvp-7g0UqqKiwSbjMR3mar-Hnl9CjVfGW5Z_9UeScXmIN_rhfAqotrfvCKjRdPRuQ53lOEeLzwWXQw/s200/images+%252819%2529.jpeg)
*....तर मोदी 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील - धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली भीती* औरंगाबाद दि 9 ---- डॉ. ए.पी.जे. कलाम हे 2020 साली भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत होते, मात्र सध्याचे सरकार 2022 साली संपूर्ण संविधानच बदलून टाकण्याचे स्वप्न पाहत आहे अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आयोजित संविधान बचाव परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री फोजिया खान, आ. राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, भाऊसाहेब चिकटगावकर, प्रकाश गजभिये, विजय भाम्बळे, सौ. चित्राताई वाघ, सुरेखाताई ठाकरे, कदिर मौलाना आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देशाची वाटचाल योग्य रितीने चालली होता. मात्र आज या संविधानावर घाला घातला जात आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील अशी भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. काही वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी सरकारची पोलखोल केली म्हणून त्यांना घरी