ऐतिहासिक विजयी संकल्प सभा :_हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन_

*केंद्रात आणि राज्यात परिवर्तन आणि विजयाच्या संकल्पासाठी आज बीडमध्ये श्री.शरदचंद्र पवार साहेब रणशिंग फुंकणार*

_*ऐतिहासिक विजयी संकल्प सभेची जय्यत तयारी*_

_हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन_

बीड दि. 30............... राज्यात आणि केंद्रातील जनता विरोधी सरकार उलथवून टाकण्यासाठी बीडच्या भूमीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब हे सोमवारी विजयी संकल्प सभेच्या माध्यमातून रणशिंग फुंकणार आहेत.

 बीडच्या नगरीतील ही ऐतिहासिक सभा न भूतो न भविष्यती व्हावी, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडीत, जिल्हा अध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, युवक नेते संदिप क्षीरसागर आदींनी केले आहे.

   बीड शहराच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर असलेल्या बागलानी ईस्टेट येथे प्रथमच ही विजयी संकल्प सभा उद्या सोमवार दिनांक 01 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 12 वाजता होणार असून, सभेचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब हे भूषवणार आहेत.

 या सभेसाठी श्री.पवार साहेब यांचे रविवारी सायंकाळी बीड शहरात आगमन झाले. या सभेसाठी मागील 15 दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात येत आहे. प्रमुख नेत्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मेळावे घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. संपुर्ण बीड शहरात डिजिटल बॅनर, झेंडे यांनी वातावरण राष्ट्रवादी कॉंग्रेसमय झाले आहे. सभेच्या ठिकाणी भव्य सभा मंडप टाकण्यात आला असून, उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी पत्र्यांचे अच्छादन असलेला मंडप टाकण्यात आला आहे. आतमध्ये पंख्यांचीही सोय करण्यात आली आलेली आहे. सभेसाठी येणार्‍या नागरिकांना अधिक सुलभता व्हावी या दृष्टीने संपुर्ण तयारी करण्यात आली असून, त्याच्या तयारीसाठी असंख्य कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून अथक परिश्रम घेत आहेत. 

     बीड जिल्हा हा नेहमीच पवार साहेबांच्या विचारांना मानणारा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. यापूर्वी या जिल्ह्याने पवार साहेबांना भरभरून प्रेम दिले आहे, तब्बल 3 वर्षानंतर पवार हे बीड जिल्ह्यात येत असल्याने ते काय बोलतात याकडे संपुर्ण जिल्हा वासियांकडे लक्ष लागलेले आहे. 

  राज्य आणि देशातील परिस्थिती आणि त्यातून सुरू करावयाचा परिवर्तनाचा लढा व आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विजय मिळवायचाच हा संकल्प या मेळाव्याच्या माध्यमातून श्री.पवार साहेब कार्यकर्त्यांना देणार असल्याने कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

 या मेळाव्यास जिल्ह्यातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडीत, जिल्हा अध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, युवक नेते संदिप क्षीरसागर, माजी आ.उषाताई दराडे, माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी आ.राजेंद्र जगताप, युवक नेते अक्षय मुंदडा, बाळासाहेब आजबे काका, महेंद्र गर्जे आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !