राष्ट्रवादी विजयी संकल्प सभेची जय्यत तयारी


राष्ट्रवादी विजयी संकल्प सभेची जय्यत तयारी

ना. मुंडे, पंडित, क्षिरसागर यांनी केली स्टेज आणि परिसराची पाहणी

 गेवराई, दि.२९ (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि.१ ऑक्टोबर रोजी बीड येथे होणार्‍या राष्ट्रवादी विजयी संकल्प सभेची जय्यत तयारी झाली असून ना.धनंजय मुंडे यांनी सभास्थळी जावून उभारलेला स्टेजची पाहणी करून उपस्थितांना विविध सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आ.अमरसिंह पंडित, जि.प.सदस्य संदीप क्षिरसागर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने बीड येथे पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि.१ ऑक्टोबर रोजी बीड येथील बागलाने ईस्टेट नाट्यगृहासमोर भव्यदिव्य राष्ट्रवादी विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे स्टेज ६०×४० असुन एक लाख लोक बसतील अशी व्यवस्था केली आहे. पुर्ण बीड शहरासह जिल्ह्यात बँनरच्या माध्यमातून उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. 

या सभेची संपूर्ण जय्यत तयारी झाली असून आज ना.धनंजय मुंडे यांनी सभास्थळी जावून उभारलेल्या स्टेजची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना वेगवेगळ्या सूचना केल्या. खा.शरदचंद्रजी पवार यांची ही सभा ऐतिहासिक होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तगडे नियोजन केले असून सभा यशस्वी करण्यासाठी ना.धनंजय मुंडे, माजी आ.अमरसिंह पंडित, जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासह महेंद्र गर्जे, अविनाश नाईकवाडे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी परिश्रम घेत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !