इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

बीडच्या ऐतिहासिक विजयी संकल्प सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे - बाजीराव धर्माधिकारी


बीडच्या ऐतिहासिक विजयी संकल्प सभेला
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे - बाजीराव धर्माधिकारी

परळी वैजनाथ  दि. 30............... राज्यात आणि केंद्रातील जनता विरोधी सरकार उलथवून टाकण्यासाठी बीडच्या भूमीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.श्री. शरदचंद्रजी पवार  हे सोमवारी विजयी संकल्प सभेच्या माध्यमातून रणशिंग फुंकणार आहेत.
बीडच्या  ऐतिहासिक सभेला
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.
   बीड शहराच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर असलेल्या बागलानी ईस्टेट येथे प्रथमच ही विजयी संकल्प सभा उद्या सोमवार दिनांक 01 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 12 वाजता होणार असून, सभेचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब हे भूषवणार आहेत.
         या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या