शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी शेतकरी कंपनी विकसीत करणे महत्वाचे आहे - हवामान तज्ञ डाँ.रामचंद्र साबळे



शेतमालास योग्य भाव  मिळण्यासाठी शेतकरी कंपनी विकसीत करणे महत्वाचे आहे - हवामान तज्ञ डाँ.रामचंद्र साबळे
परळी वै:  दि 02 प्रतिनिधी

मराठवाड्यातील हवामानात प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होत असुन या बदलत्या हवामानानुसार मराठवाड्यात कृञीम पर्जन्य पाडण्याचे केंद्र विकसीत करणे याच बरोबर सह्याद्रीच्या पर्वत रांगात पावसाचे पाणी अडवुन मराठवाड्याकडे वळविणे,वृक्षसवर्धनाकरीता ' कार्बन क्रेडीट ' योजना राबविने याच बरोबर  यांनी व्यक्त केले.

मंगळवार ( दि 02)  रोजी तालुक्यातील मोहा येथे जेष्ठ स्वातंञसेनानी,बीड जिल्ह्याचे माजी खासदार तथा महाराष्ट्र शिक्षण संस्था,मोहाचे संस्थापक काँ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या 10 व्या स्मृती व्याख्यानमाले प्रसंगी जेष्ठ कृषी हवामान तज्ञ डाँ.रामचंद्र साबळे हे प्रमुख व्याख्याते म्हणुन उपस्थित होते .

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष काँ.डाँ.डि.एल कराड,कामगार नेते काँ.सईद अहमद,माकपाचे नाशिकचे जिल्हा सचिव काँ.देविदास आडोळे यांच्यासह स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई,ग्राम पंचायत मोहा,महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा चे सर्व सन्माननिय संचालक,सदस्य आदी  उपस्थित होते.

पुढे बोलताना डाँ.साबळे म्हणाले की, मराठवाड्यासह देशातील हवामानात प्रचंड बदल होत आहे.देशातील एकुण  वनक्षेञाचे प्रमाण कमी होऊन उष्णता वाढीकरीता मदत करणा-या घटकात कमालीचे वाढ होतान दिसुन येते अशा परिस्थितीत विविध देशात वेगवेगळ्या पध्दतीने या हवामान बदलावर प्रयत्न सुरू असुन याची दखल अथवा य़ोग्य त्या उपक्रमाची अंमलबजावनी देशात, राज्यात करणे करजेचे आहे.राज्यातील विशेषता मराठवाड्यात पर्जन्याचे प्रमाण सरासरी 600 ते 800 मिली मिटर एवढे असुन या पर्जन्यात ही सातत्य नाही अशा परिस्थिती पारंपारीक शेती करणे नुकसानाचे असुन कमी पाऊस, कमी सुपिकता असलेल्या जमिनीत अल्प काळात येणारी पिके घेण्याची तय्यारी शेतक-यांनी करावी.देशाला स्वातंञ्य मिळुन 70 वर्ष झाली तरी देशातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची,पशुधनाच्या चा-याची कायम स्वरूपी उपाय योजना करण्यात आले नसुन येत्या काळात जर चीन सारख्या राष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या कृञीम पावसा पाडण्याचे केंद्र मराठवाड्यात विकसीत करणे,राज्यात सर्वाधीक पाऊस पडणा-या सह्याद्रीच्या पर्वत रांगात पावसाचे पाणी आडवुन ते मराठवाड्याकडे वळती करणे,वृक्ष संवर्धनाकरीता हिमाचल प्रदेशात राबविण्यात येत असलेल्या कार्बन क्रेडिट योजना राज्यात व मराठवाड्यात राबविणे व शेती आलेल्या पिकाला योग्य भाव मिळण्याकरीता शेतकरी कंपनी स्थापन करणे अशा उपाय योजना शासन स्तरावर होणे ही काळची गरज असुन ह्या गोष्टी गांभीर्याने जर घेतल्या नाही तर मराठवाड्यातील पाण्यासाठीची होणारी वणवण अनखी तिव्र होईल. मराठवाड्यातील शेतक-यांनी देखील पारंपारीक ऊस,कापसासारखे पिके न घेता एरंडेल,सिताफळ,रामफळ आदी सारख्या कमी पाण्यात,कमी काळात जास्त उत्पन्न देणारी पिके घ्यावीत असे मत जेष्ठ कृषी हवामान तज्ञ डाँ.साबळे यांनी व्यक्त केले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रतिष्ठाणचे अध्यक्ष काँ.डाँ.डि.एल कराड यांनी सांगितले की,काँ.अप्पामुळे मि नव्हे माझ्यासारखी हजारो लोक आज विविध प्रतिष्ठीत पदावर कार्यरत आहेत. समाजाशी निगडीत,जिवन मानाशी संबंधीत सर्वसामान्य मानसाच्या अपेक्षा पुर्ण होतील व त्याच्या ज्ञानात वृध्दी होऊन जिवनमान सुधारण्यास मदत होईल असे व्यक्तीमत्व प्रतिष्ठानच्या माध्यमातुन स्मृती व्याख्यानमालेस निमंञीत करण्यात येत असतात.काँ.अप्पाच्या विचाराचा वारसा पुढे नेत असताना च्या प्रमाणे  गावातील सर्व सामान्य नागरिकांनी जात-पात- पक्ष विसरून काँ.अप्पांना सोबत दिली तसेच सोबत कायम ठेऊन गाव- समाज समृध्द करण्यासाठी एक होऊया असे मत व्यक्त केले

 कार्यक्रमाच्या प्रास्तावितातुन संस्थेचे सचिव अँड.अजय बुरांडे यांनी मागील 5 वर्षापासुन गावामध्ये  होत असलेल्या जलसंधारणासोबतच जमिन व शेती सुधार कामासंदर्भात महिती दिली तसेच काँ.गंगाधर अप्पा बुरांडे यांनी पेरलेल्या क्रांतीकारी विचारावर वाटचाल करीत येणा-या काळात ही गावातील सर्वांना सोबत घेऊन शाश्वत ग्राम विकासाचे कार्य सुरू राहील असे सांगीतले.

वैद्यकिय व्यवसायातुन गोरगरीब नागरिकांना महागडे उपचार व सर्वोतपरी मोफत मदत करणारे
काँ.गंगाधरअप्पाचे जेष्ठ चिरंजीव तथा स्मृती प्रतिष्ठानचे सदस्य डाँ.विजय बुरांडे यांचे दि 26 रोजी दुखद निधन झाले याबद्दल संस्थेचे अध्यक्ष काँ.प्रा बाबासाहेब सरवदे यांनी डाँ.विजय बुरांडे यांच्या कार्याला उजाळा देऊन कार्यक्रम स्थळी सामुदायीक श्रध्दांजली देण्यात आली.

या स्मृती व्याख्यानमालेेेचे सुञसंचलन ज्ञानेश्वर रेड्डी तर आभार व्यक्त महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कदम यांनी केले.

🌑दुखाचे सावट असताना ही प्रतिष्ठानच्यावतीने दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन
🌑काँ.अप्पांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित
🌑प्रमुख वक्ते हवामान तज्ञ डाँ.साबळे कडुन गावात केलेल्या जलसंधारण कार्याचे कौतुक
🌑मान -सन्मान, आदरातिथ्य बाजुला ठेवत फुलांची नासाडी न करता  पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !