मिस्त्री कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार - कामगार नेते उमेशे खाडे


ना. पंकजाताई मुंडे व खा. प्रितम ताई मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली
 मिस्त्री कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार -  कामगार नेते उमेशे खाडे

परळी : प्रतीनिधी
परळी येथील ऑल इंडिया मिस्त्री कामगार संघटनेची पेठ मोहल्ला परळी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकी मध्ये कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व त्याना शासनाच्या योजने चा लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यानी जनजागृती करावी गरिब वंचित याना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन  ऑल इंडिया मिस्त्री कामगार संघटने चे प्रदेश अध्यक्ष उमेश खाडे  यांनी केले आहे.
       
           यावेळी  बैठकीचा अध्यक्षस्थानी माजी नगर सेवक ताज खान मामु ,तर प्रमुख पाहुणे म्हणून   भाजपचे शहर उपध्यक्ष राजेंद्र ओझा, ज्येष्ठ नेते  जमील टेलर,भाजपा सोशल मिडिया बीड जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार खोसे ऑल इंडिया मिस्त्री कामगार संघटने चे जिल्हाअध्यक्ष अय्युब पठाण, संघटनचे शहराध्यक्ष शेख ज़मीर, ज माल भाई,उपस्थित होते.  



         आपल्या भाषणात उमेश खाडे म्हणाले महाराष्ट्र राज्याच्या ग्राम विकास व महीला बाल कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याचे खा. प्रितम ताई मुंडे यांनी कामगारां साठी विविध शासकीय योजना आणल्या आहेत. या योजना मध्ये नोंदणीकृत  कामगारांना दोन पाल्यांना इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु.१०,०००/-   यासाठी शैक्षणीक सहाय.नोंदणीकृत  लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना अथवा पुरूष कामगारांच्या पत्नीस पहिल्या प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाची पुस्तके व शैक्षणीक सामाग्री साठी रु २०,००० -\ ( रु विस हजार ) एवढे शैक्षणिक सहाय्य नोंदणीकृत  लाभार्थी कामगारांचा ७५% किंवा कायमचे अपंत्व अस्ल्यास त्यास रु दोन लाख ऐवढे आर्थिक सहाय्य.तथा नोंदणीकृत  बांधकाम कामगारांचे विमा सरंक्षण असल्यास विमा रक्कमची प्रतीपुर्ती अथवा मंडळमार्फत रू २ लाख आर्थिक सहाय्य या पैकी कोण्त्याही एक लाभ अनुज्ञेय राहील. अशा विविध योजनाचा ना. पंकजाताई मुंडे व खा. प्रितम ताई मुंडे यांचा मार्गदर्शन खाली मिस्त्री कामगारांना लाभ मिळुन देणार असल्याचे त्यांनी सांगीतले .
               आपल्या  अध्यक्षीय  भाषणात माजी नगरसेवक ताज खान मामु यानी संघटनेचे कार्य कौतुकास्पद असुन कामगारांचा प्रश्नांची जाणीव व त्यांच्या साठी लढा देणारी बीड जिल्हातील एकमेव संघटना आहे व श्री उमेश खाडे यांच्या कार्याचा आम्हास अभिमान आहे असे उदगार व्यक्त केले. या वेळी  एराज भाई, नसीब खान, जमील भाई, सद्दाम, सल्लु भाई, वाहेद भाई, सचिन मुंडे, शेख मुजफ्फर, लायक भाई,  व कामगार बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !