इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी*


*स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न!*
●_सभासदांना १०  टक्के लाभांश जाहीर_●

*ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर  वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी*

परळी वैजनाथ /प्रतिनिधी-दि.
शहरातील अग्रगण्य पतसंस्था स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतंसस्थेने अ्रल्पावधीतच ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे.शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात ठरवलेले ठेवींचे उद्दीष्ट पुर्ण केले आहे.पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात 15 कोटी रूपयांच्या ठेवीचे उद्दीष्ट गाठले असुन ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावरच ही वाटचाल आहे.असा विश्‍वास पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या वेळी ते बोलत होते.

    संस्थेच्या कार्यालयात आज अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या वेळी आहवाल व ताळेबंद सभेत सादर करण्यात आला. सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2018 अखेर संस्थेचा उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विषेश म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी 15 कोटी 14 लक्ष रूपये तर भागभांडवल-  38,92,350,  ठेवी 15,14,52,879, कर्ज  12,48, 34, 205, गुंतवणूक  3,86,54,930,नफा 19,05,067 आहे.

    पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार,ठेवीदार,कर्जदार,हितचितक यांचा विश्‍वास हेच पाठबळ आहे. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे ,कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे,राजाभाऊ मराठे,रंगनाथ सावजी,रवि मुळे,दशरथ होळकर,डॉ.सौ.श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी  यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी व सर्व कर्मचारी वृंद, नित्यसंचय ठेव प्रतिनीधी यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या